आॅलिम्पिक खेळांडूची कमाई असते तरी किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2016 12:31 PM2016-08-17T12:31:15+5:302016-08-17T18:01:15+5:30

अमेरिकेची आॅलिम्पिक समिती गोल्ड मेडल विजेत्या खेळाडूला १६.७ लाख रु., सिल्वरसाठी दहा लाख रु. तर ब्राँझ मेडल खेळाडूला ६.६ लाख रु.) बक्षीस देते.

How much is the income of the Olympic Games? | आॅलिम्पिक खेळांडूची कमाई असते तरी किती?

आॅलिम्पिक खेळांडूची कमाई असते तरी किती?

Next
्या ब्राझीलची राजधानी रिओ-दी-जानेरो येथे सुरू असेलेल्या ३१व्या आॅलिम्पिक स्पर्धेचा संपूर्ण जगावर फिव्हर चढलेला आहे. रात्र-रात्र उशिरापर्यंत जागून कधीही न पाहिले जाणारे खेळ आपण पाहू लागलो. भारताची कामगिरी जरी अद्याप उत्साहवर्धक नसली तरी पुसटशी ओळख असणाऱ्या विदेशातील सुपरस्टार खेळाडूंच्या विजयावर आपसुकच टाळ्या वाजू लागलो. 

आॅलिम्पिकची भव्यता पाहून सहजच मनात विचार येतो की, खरंच किती कमवत असतील हे खेळाडू? सुवर्ण-रजत-कांस्य पदकांशिवाय त्यांची आर्थिक मिळकत काय असेल? 

पदक विजेत्या खेळाडूंना  त्या त्या देशाच्या आॅलिम्पिक संघटनांकडून काही रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते. अमेरिकेची आॅलिम्पिक समिती गोल्ड मेडल विजेत्या खेळाडूला २५ हजार डॉलर्स (१६.७ लाख रु.), सिल्वरसाठी १५ हजार डॉलर्स (दहा लाख रु.) तर ब्राँझ मेडल खेळाडूला दहा हजार डॉलर्सचे (६.६ लाख रु.) बक्षीस देते. यंदा फेल्प्सने पाच सुवर्ण आणि एक रजतपदक जिंकले आहे. याचा अर्थ की, त्याला बक्षीसस्वरुपातच १.४ लाख डॉलर्स (९३.७ लाख रु) मिळणार आहेत.

सिंगापूरच्या पदक विजेत्यांना सर्वाधिक बक्षीस रक्कम देण्यात येते. तेथे गोल्डसाठी ७.५ लाख डॉलर्स (५ कोटी रु.), सिल्वरसाठी ३.७ लाख डॉलर्स (२.४ कोटी रु.) तर ब्राँझसाठी १.८९ लाख डॉलर्स (१.२६ कोटी रु) अशी तगडी रक्कम देण्यात येते.

Web Title: How much is the income of the Olympic Games?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.