रुसलेल्या प्रेयसीची समजूत कशी काढाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:21+5:302016-02-05T06:32:11+5:30

प्रेमात मन फुलपाखरू होतं..जीवलगाच्या सभोवताल सारखं उंडाळत राहतं..चुकूनही जोडीदाराचे मन दुखू नये

How to understand the love of a loved one? | रुसलेल्या प्रेयसीची समजूत कशी काढाल?

रुसलेल्या प्रेयसीची समजूत कशी काढाल?

Next
रेमात मन फुलपाखरू होतं..जीवलगाच्या सभोवताल सारखं उंडाळत राहतं..चुकूनही जोडीदाराचे मन दुखू नये म्हणून फुलासारखा त्याला जपत राहतं..पण, एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याही नकळत आपला एखादा शब्द आपल्या आवडत्या व्यक्तीच्या थेट काळजाला भिडतो आणि मग सुरू होतो जीवघेणा अबोला. हा अबोला जसाजसा लांबत जातो तशीतशी जीवाची घालमेलही वाढत जाते. प्रेमातला गोडवा अनुभवायचा असेल तर हा अबोला लवकर संपायला हवा. काय विचारताय..कसा संपवायचा? वाचा मग खाली.. १. सॅड मेसेज पाठवू नका
भांडणानंतर येणारा अबोला दोघांचीही सहनशक्ती तपासणारा असतो. म्हणून तिला वा त्याला सॅड मेसेज पाठवणे, डेस्परेट होऊन उलटसुलट बोलणे वगैरे अशा गोष्टी अजिबात करू नका. त्याऐवजी तुमची चूक झाली हे सरळ सरळ मान्य करा आणि प्रामाणिकपणे मी स्वत:मध्ये बदल करणार हे आपल्या प्रेमाला विश्‍वासाने सांगा.
२. न झेपणारे प्रॉमिस करू नका
प्रेयसीला पुन्हा मिळवण्यासाठी मुलं आवेशात वाटेल ते प्रॉमिस किंवा वचन देतात. परंतु नाते तुटल्यावर अशा आश्‍वासनांचा काहीच उपयोग होत नसतो. याउलट तिला यातून सावरण्यासाठी वेळ द्या. आपले काय चुकले, आपण कुठे दुर्लक्ष केले याचा शांतपणे विचार करा.
३. गिफ्ट देऊ नका
तुमच्याकडून जी चूक झाली त्याची भरपाई म्हणून गिफ्ट देऊ नका. तुमची बदललेली वागणूकच तुमच्या जीवलगासाठी गिफ्ट ठरेल. झालेल्या चुका सुधारा, तुमचा कोणता गुण तिला/त्याला जास्त आवडतो ते शोधा. महागडे गिफ्ट दिल्याने तुमची विश्‍वासहर्ता वाढेल असे समजू नका.
४. तिला गृहित धरू नका
अनेक मुलांना असे वाटते की मुलींचा राग क्षणिक असतो. आपण दोन-तीन वेळा सॉरी म्हटले की त्या पुन्हा आपल्या जवळ येतात. तुम्ही पण असाच विचार करत असाल ते साफ खोटं आहे. मुलींन गृहित धरण्याची चूक कधीच करू नका. प्रत्येक नाते युनिक असते. त्यामुळे त्याला जनरल रूल लागू होत नाही.
५. खोटे तर बोलूच नका
भांडण झाल्यावर काहीही खोटं बोलून वेळ मारली जाते. पण, या नात्याची सुंदर इमारत विश्‍वासाच्या पायव्यावरच उभी राहते हे विसरू नका. ब्रेक-अप वेदनामय असते हे खरे आहे. पण, आपला खरेपणा यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.

Web Title: How to understand the love of a loved one?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.