​HUG DAY SPECIAL : आलिंगन द्या मात्र सांभाळून !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 11:58 AM2017-02-10T11:58:28+5:302017-02-10T17:28:28+5:30

आपल्या पार्टनरला आपणास आलिंगन द्यावेसे वाटते मात्र, इच्छा असूनही ते करु शकत नसाल तर आपण या दिवशी आपण नि:संकोच आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त करु शकता.

HUG DAY SPECIAL: Embrace hugs but! | ​HUG DAY SPECIAL : आलिंगन द्या मात्र सांभाळून !

​HUG DAY SPECIAL : आलिंगन द्या मात्र सांभाळून !

Next
ong>-Ravindra More

प्रेमवीरांना प्रेम करणे, हग (आलिंगन) तसेच चुंबन घेण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची तशी वाट पाहण्याची गरज पडत नाही. आपल्या पार्टनरला आपणास आलिंगन द्यावेसे वाटते मात्र, इच्छा असूनही ते करु शकत नसाल तर आपण या दिवशी आपण नि:संकोच आलिंगन देत आपल्या भावना व्यक्त करु शकता. असे करताना काळजीही घ्यावी लागेल. अति उत्साहात काही गडबड होऊन आपल्या पार्टनरला नाराज करु नका. आज आम्ही आपणास आपल्या पार्टनरला आलिंगन देत दोघांमधील दुरावा दूर होत आपले प्रेम कसे वाढेल याविषयी माहिती देत आहोत.

* आपण प्रेमाने आपल्या पार्टनरला आलिंगन करुन आपण त्यांना किती प्रेम करता याची जाणीव करुन द्या आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात किती आदर आहे हे देखील त्यांना कळू द्या. 

* आपल्या प्रेमाचा सहवास त्यांना व्हावा यासाठी आपल्या पार्टनरला सहज आलिंगन देत प्रेम व्यक्त करा आणि त्यांना कळतनकळत जादूची झप्पी द्या. मग पाहा आपल्या पार्टनरच्या डोळ्यात प्रेमच प्रेम दिसेल. असे केल्याने प्रेमाची तर जाणीव होते शिवाय आपुलकीदेखील वाढते आणि सकारात्मक विचार मनात येतात असे बऱ्याच संशोधनाद्वारे स्पष्ट झाले आहे. 

* आपल्या पार्टनरला जर आपण पहिल्यांदाच आलिंगन देत असाल तर आपल्या भावनांवर आपले नियंत्रण असू द्या. 

* पार्टनरला हग करतेवेळी जास्त जोरानेही गळाभेट नको आणि जास्त हलक्यास्वरूपातही नको. आपल्या भावनांची जाणीव व्हावी इतपतच आलिंगन द्यावे.

* प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आलिंगन देतात तर आपण आपल्या अंदाजात नैसर्गिक स्वरुपात विना काही मनात विचार न करता असे करा. अशाने आपल्या पार्टनरला आपल्या भावना नक्कीच कळतील. 

* काही अन्य टिप्स
* आलिंगन देतेवेळी उतावीळ होऊ नका, तर आपल्या पार्टनरच्या डोळ्यात पाहून एक प्रेमळ स्मितहास्य द्या आणि नंतर हग करा. मग पाहा आपला पार्टनर आपल्याला किती जवळ वाटेल. 

* बराच वेळ किंवा अचानक आलिंगन देऊन बाजूला होऊ नका तर अशावेळी आपल्या पार्टनरला एक प्रेमाचा संदेश किंवा रोमॅँटिक शब्द कानात गुणगुणायला विसरु  नका. 

* आपण आपल्या पार्टनरला हग करतेवेळी सतत आय कॉन्टॅक्ट करु शकता, याने आपल्या दोघातील प्रेम वाढेल आणि या जादूच्या झप्पीचा परिणामही होईल. 

* मुलींना गळ्यात हात टाकून आलिंगन देणे खूपच आवडते तर मुलांना कमरेभोवती हात टाकून आलिंगन देणे आवडते. आपण आपल्या गर्लफ्रेंडला जर आलिंगन देत असाल तर तिच्या कमरेभोवती हात टाकून आलिंगन द्या आणि जर आपल्या बॉयफ्रेंडला आलिंगन देत असाल तर त्याच्या गळ्यात आपले हात टाका. याने आपण दोघेही एकमेकांना अगदी जवळ भासाल.

Web Title: HUG DAY SPECIAL: Embrace hugs but!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.