​मी मी म्हणणार्‍याचे आॅनलाईन फावते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2016 03:33 PM2016-07-08T15:33:21+5:302016-07-08T21:03:21+5:30

आत्मप्रशंसेच्या मागे पळणारे लोक सोशल मीडियाचा वापर स्वत:चा प्रचार व स्वार्थ साधण्यासाठी करतात.

I would say the online line of life is dead | ​मी मी म्हणणार्‍याचे आॅनलाईन फावते

​मी मी म्हणणार्‍याचे आॅनलाईन फावते

googlenewsNext
त्मपूजक’ म्हणजेच केवळ स्वत:ची स्तुती किंवा प्रशंसेसाठी भुके ल्या लोकांसाठी ‘फेसबुक’च्या निमित्ताने खुले मैदान मिळाले आहे. एका संशोधनातून असे समोर आले की, आत्मप्रशंसेच्या मागे पळणारे लोक सोशल मीडियाचा वापर स्वत:चा प्रचार व स्वार्थ साधण्यासाठी करतात.

इटलीमधील ‘फ्लोरेन्स विद्यापीठा’तील संशोधकांनी प्रस्तूत अध्ययनात कोणत्या प्रकारचे आत्मपूजक लोक सोशल मीडियाच्या अतिआहारी जाण्याची शक्यता जास्त असते हे जाणून घेण्यासाठी ५३५ विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. ज्या लोकांमध्ये स्वत:बद्दल असुरक्षितता आणि आत्मविश्वास व आत्मसन्मानाचा अभाव असतो ते प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा आॅनलाईन अधिक सुरक्षित मानतात. त्यामुळे समाजात खुलेपणाने वावरण्यापेक्षा ते सोशल मीडियावर राहणे अधिक पसंत करतात.

परंतु जे आत्मपूजक लोक इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यात सक्षम असतात ते मात्र सोशल मीडियाच्या कुबड्यांचा आधार घेत नाही. संशोधक म्हणतात की, अधिक भपकेबाज लोकांमध्ये फेसबुकचे अतिवेड दिसून ये नाही.

संशोधनात असेदेखील सुचवले आहे की, फेसबुकचा गैर वापर करण्यामागे असुरक्षित आत्मपूजक लोक अधिक कारणीभूत असतात. हे संशोधन आॅनलाईन जर्नल ‘सायबरसायकोलॉजी, बिहेव्हिएर आणि सोशल नेटवर्किंग’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

Web Title: I would say the online line of life is dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.