डोकेदुखीमुळे त्रस्त असाल तर वापरा हे घरगुती "फंडे"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 04:18 PM2017-07-23T16:18:01+5:302017-07-23T16:18:01+5:30
मुंबई,दि.23- डोकेदुखीसाठी मनानंच औषध घेण्यापेक्षा नैसर्गिक उपचार करणं जास्त हिताचं ठरतं. डोकेदुखीपासून वाचण्यासाठी काय करावं, यावर एक नजर...
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.23- वातावरणात बदल होणं म्हणजे अनेकांसाठी आजारपणाला निमंत्रण देण्यासारखं असतं. आता पावसाळ्यातही बऱ्याच जणांना सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होत असतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही डोकेदुखीमागे विविध कारणं असू शकतात. सामान्य डोकेदुखीवर उपाय करण्यासाठी औषधी किंवा गोळ्या घेण्याची गरज नाही. सातत्याने औषधं घेतल्यानं अनेकदा दुष्परिणाम होऊ शकतात. डोकेदुखी का होत आहे, याचं कारण आधी शोधलं पाहिजे. त्यानंतर त्यावर इलाज व्हायला हवा. डोकेदुखीसाठी मनानंच औषध घेण्यापेक्षा नैसर्गिक उपचार करणं जास्त हिताचं ठरतं. डोकेदुखीपासून वाचण्यासाठी काय करावं, यावर एक नजर...
- पाणी प्या_शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी पिणं हादेखील डोकेदुखीवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय आहे.
- मसाज करा_डोक्याच्या मागील बाजूला मसाज केल्याने डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. जास्त जोर न लावताच खरंतर मसाज करणं आवश्यक आहे. यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्लाही घेता येईल.
- अॅक्युप्रेशर करा_अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या मासावर एक मिनिटापर्यंत दाब द्या. त्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.
- स्ट्रेच करून पहा_अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. त्यामुळे साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळेल; पण हे स्ट्रेचिंग करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
- बर्फाचा शेक_ डोक्याच्या नसांवर सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक देणं हितावह होईल. वातावरण पाहून हा शेक घ्यायचा किंवा नाही, हे ठरवा.
- लवंग लाभदायक_व्यावर लवंगीच्या काही पाकळ्या शेकून घ्या. त्यानंतर गरम असलेल्या या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून लवंगीचा वास घेत राहा. असं थोडा वेळ केल्यामुळे फायदा होईल.
- टरबूज खा_* टरबुजासारखं पाणीदार फळ खाल्ल्यानं चांगला फायदा होतो. त्यामुळे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे अशा फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश करावा.
- दीर्घ श्वसन करा_* ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकदा डोकेदुखी होते. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो अशा भरपूर झाडं असलेल्या भागात जावं. तिथं काही काळ दीर्घ श्वसनाचा अभ्यास करावा.
- लिंबू पाणी देईल आराम_* लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. त्यामुळे शरीरातील आम्लांचं प्रमाण संतुलित होतं. शरीरातील आम्लांचं प्रमाण बिघडलं, तरी डोकेदुखी होते.
- आलेयुक्त चहा_* आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहतं.