पार्टी -समारंभात जरा हटके दिसायचंय मग अॅसिमेट्रिक ड्रेस आणि अॅसिमेट्रिक अॅक्सेसरीज ट्राय करा. नक्की अॅट्रॅक्टिव्ह दिसाल!
By admin | Published: July 4, 2017 06:13 PM2017-07-04T18:13:08+5:302017-07-04T18:13:41+5:30
स्टायलिश कपडे वापरण्याचा आनंद उपभोगायचा असेल तर अँसिमेट्रिक ड्रेस घालून बघायला हवेत .
- मोहिनी घारपुरे-देशमुख
अॅसिमेट्रिक ड्रेस या नावानेच अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. परंतु अलिकडे फॅशन जगतात हे अॅसिमेट्रीक ड्रेसेस खूप लक्षवेधी ठरत आहेत. विशेषत: पार्टीजला जाताना हे अॅसिमेट्रिक ड्रेसेसच घालण्यास विशेष पसंती दिली जाते.
अॅसिमेट्रिक ड्रेसच का?
* हे ड्रेसेस अत्यंत क्लासिक दिसतात.
* या ड्रेसची धाटणीच अशी असते की त्यामुळे लुकला एकदम उठाव येतो अणि तुम्ही वयापेक्षा तरूणच भासू लागता.
* स्किनी जीन्स, लेगिंग्स यावर हे ड्रेसेस शोभून दिसतात. तसेच वयापरत्त्वे सुटलेलं पोटही हे ड्रेस आरामात झाकून टाकतात. त्यामुळेच हे ड्रेसस चाळीशीच्या घरातील महिलांनी तरूण दिसण्यासाठी आवडीनं घातले तर त्यात फार आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.