मानसिक आरोग्य वाढवायचेय? मग या पाच गोष्टी कराच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 01:04 PM2017-01-29T13:04:16+5:302017-01-29T18:34:16+5:30

जर तुम्हाला निराश वाटत असेल, आर्थिक चणचण असल्यामुळे चिंता वाटत असेल तर केवळ ह्यसकारात्मक विचारह्ण करून बरे वाटणार नाही. त्यासाठी शरीराचीसुद्धा हालचाल गरजेचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांना शारीरिक व्यायामचे औषध उपलब्ध आहे.

Increase mental health? Then do these five things | मानसिक आरोग्य वाढवायचेय? मग या पाच गोष्टी कराच

मानसिक आरोग्य वाढवायचेय? मग या पाच गोष्टी कराच

Next
काल मनावर टेंशन, ताण-तणाव, दबाव-दडपण, भीती आणि चिंता असणे फार सामन्य बाब आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य खालवण्याच्या तक्रारी आपण वरच्या वर ऐकत असतो. ह्यमेंटल स्ट्रेंग्थह्ण वाढविण्यासाठी किंवा ती अधिक बळकट करण्यासाठी आपण ध्यान-धारणा किंवा मेडिटेशन वगैरे करतो परंतु त्यामुळे हवा तसा परिणाम होताना दिसत नाही.

मग अशा वेळी शारीरिक व्यायाम कामी येऊ शकतो. आश्चर्य वाटले? मानसिक आरोग्य आणि शारीरिक व्यायामाच संबंध कसा असू शकतो? अहो, ग्रीक लोकांना फार फार वर्षांपूर्वीच मन आणि शरीराचा संबंध ज्ञात होता. आता ती वेगळी गोष्ट आहे की, वैद्यकशास्त्राला तो संबंध मान्य करायला मध्यंतरी बराच काळ गेला; पण आता अनेक वैज्ञानिक संशोधनातून शारीरिक आणि मानिकस आरोग्यातील परस्पर संबंध सिद्ध झाला आहे.

म्हणजे जर तुम्हाला निराश वाटत असेल, आर्थिक चणचण असल्यामुळे चिंता वाटत असेल तर केवळ ह्यसकारात्मक विचारह्ण करून बरे वाटणार नाही. त्यासाठी शरीराचीसुद्धा हालचाल गरजेचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांना शारीरिक व्यायामचे औषध उपलब्ध आहे.

तुमचे मानसिक आरोग्य अधिक बळकट करण्यासाठी पुढील पाच शारीरिक म्हटल्या जाऊ शकतात अशा गोष्टी केल्या पाहिजेत.

१. नैराश्य कमी करण्यासाठी चालणे वाढवा

मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांवर शारीरिक हालचालींच्या उपचाराची उपयुक्तता  अनेक अध्ययनातून सिद्ध झालेली आहे. आठवड्याभरात कमीतकमी २०० मिनिटे जरी चालले तरी नैराश्य कमी होण्यास मदत मिळते. म्हणजे दिवसाकाठी ३० मिनिटे चालून तुम्ही निराश होण्यापासून वाचू शकता. चालल्यामुळे मानसिक बरोबरच भावनिक आरोग्यदेखील सुधारते.

२. शारीरिक वेदना कमी करण्यासाठी हसा

तुमचे निरागस-मनमोहक हास्य अनेक गोष्टींवर इलाजवर्धक ठरू शकते. हसमुख स्वभाव असणारे लोक तणावामुळे फरक पडत नाही. संशोधनातून असे दिसून आलेले आहे की, हसण्यामुळे तणावपूर्वक स्थितीमध्येसुद्धा तुमच्या हृदयाची स्पंदने सामान्य राहतात. त्यामुळे शारीरिक वेदनेची तीव्रता कमी जाणवते.

३. लक्ष केंद्रित करण्यासाठी दीर्घश्वास घ्या

तुमची एकाग्रता वाढविण्यासाठी काही मिनिटे दीर्घ श्वास घेणे लाभदायक ठरू शकते. तुम्ही जर मल्टीटास्कर असाल तर यामुळेच खूप फायदा होतो. एकाच वेळी अनेक कामे करणाऱ्या लोकांना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे सोप नसते. अशावेळी डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. फरक नक्कीच जाणवेल.

४.  तणावमुक्तीसाठी योगा करा

योगाचे काय काय आणि किती फायदे आहेत याची माहिती येथे सांगण्याची गरज नाही. तणाव कमी करण्यासाठी तर योगा केलाच पाहिजे. चिंता व इतर मानसिक समस्यांवर योगामुळे नियंत्रण मिळवता येते. म्हणून रोजच्य रोज योग करायलाच हवा.

५. चिंतामुक्तीसाठी वजन उचला

जवळपास १५ टक्के लोकांना नियमितपणे अँग्झायटीची (चिंता) समस्या जाणवते. त्यामध्ये प्रामुख्याने अस्वस्थता, भीती, काळजी किंवा भीती हे कॉमन लक्षणे आहेत. लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर झापेचा त्रास, शारीरिक वेदना, आजारपण उद्भवू शकते. त्यावर चांगला उपाय म्हणजे वजन उचलणे. विशेष म्हणजे अवजड वस्तू नाही तर किमान शारीरिक क्षमतेला आव्हानात्मक व्यायाम करावा.

Web Title: Increase mental health? Then do these five things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.