​चष्मा वापरल्याने वाढतो आत्मविश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2016 08:14 AM2016-09-22T08:14:40+5:302016-09-22T13:44:40+5:30

काही वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या निदानानंतर आपल्याला चष्मा लावावा लागेल, हे कळल्यावर चष्मामुळे चेहºयावर येणाºया बावळटपणा टाळण्यासाठी लेन्स लावल्या तर चालतील का?

Increases the confidence of using glasses! | ​चष्मा वापरल्याने वाढतो आत्मविश्वास !

​चष्मा वापरल्याने वाढतो आत्मविश्वास !

Next

/>काही वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या निदानानंतर आपल्याला चष्मा लावावा लागेल, हे कळल्यावर चष्मामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या बावळटपणा टाळण्यासाठी लेन्स लावल्या तर चालतील का? असा प्रश्न आवर्जून विचारला जायायचा. मात्र आता बदलत्या काळानुसार हॉलिवूडचे अनुकरण करुन बॉलिवूडमध्ये आणि परिणामी आजच्या तरुणाईमध्ये स्टायलिश चष्माने जागा घेतली आहे. एकंदरीत चष्म्यामुळे चेहऱ्यावर येणारा सीरियस आणि इन्टेन्स लुक आता तरुणाईला हवाहवासा वाटू लागल्याने चष्मा हे जगात अधिक आत्मविश्वासाने आणि स्टायलिशपणे वावरण्यासाठीचे साधन बनले आहे.  
 
  
कॉलेजमध्ये एखादी तरुणी चष्मा लावून आल्यावर आपण लगेच ‘चष्मिश’ म्हणायचो. हाच प्रकार आपल्याला ‘ये जवानी हे दिवानी’ चित्रपटात पाहावयास मिळाला. या चित्रपटात डोळ्याला चष्मा, हातात पुस्तकांचा ढीग घेऊन उभ्या असलेल्या दीपिकाला पाहताच क्षणी रणबीर तिला ‘चष्मिश’ म्हणतो. एरवी कॉलेजमध्ये एखाद्या मुलाने मुलीला असं म्हटलं असतं तर, तिने त्याची गचांडी धरली असती. पण रणबीरच्या ‘चष्मिश’ बोलण्यामध्येही मुलींनी ‘रोमान्टिसिझम’ शोधला..


फॅशनिस्ट सोनम कपूरनेही सध्या आपला लुक बदलला असून तिच्या इन्टाग्राम फोटोजमध्ये मोठा फ्रेमचा चष्मा घालून बसलेली दिसते. सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, रणबीर कपूर, हृतिक रोशन, जॉन अब्राहम अशा कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटिज मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये चष्मा चढवून वावरताना दिसतात. चित्रपटसृष्टीतच नव्हे तर, नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी वावरताना चष्म्यामुळे चेहºयावर येणारा ‘मॅच्युअर लुक’ वरिष्ठांमध्ये तुमच्याबद्दल विश्वास वाढवण्यास मदत करतो, हे अनेकदा आढळून आलं आहे. 
चष्म्यांचे महत्त्व अशा प्रकारे वाढल्याने मार्केटमध्ये विविध प्रकारच्या स्टायलिश चष्म्यांनी आपले स्थान प्रस्थापित केले आहे. मात्र, आपल्या चेहºयासाठी चांगला चष्मा निवडताना नीट पारख करणं अत्यावश्यक आहे. अतिफॅन्सी किंवा कॅट आय फ्रेम असलेले चष्मे घेणं, टाळलं पाहिजे. असे चष्मे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवण्यापेक्षा त्यांना बेढब बनवू शकतात. म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाला खुलून दिसेल असाच चष्मा निवडा.
अशी निवडा फ्रेम-
* कॉन्ट्रास्ट फ्रेम-
आपल्या चेहऱ्याचा आकार आणि वापरत असलेल्या चष्म्याची फे्रम यात नेहमी कॉन्ट्रास्ट (विरोधाभास) हवे. चेहºयावर चष्मा उठून दिसण्यासाठी तुमचा चेहरा उभा असल्यास तुम्ही गोलाकार किंवा आयताकृती फ्रेम निवडू शकता.

*  फ्रेमचे माप -
फॅशनच्या बदलत्या काळानूसार आपल्यालाही बदलायला हवे. फे्रमचे माप आपल्या चेहºयाच्या मापापेक्षा जास्त मोठे किंवा जास्त लहान असू नये. आपल्यासाठी योग्य मापाची फे्रम निवडताना आपल्याला बºयाच फे्रम चेहºयावर लावून पाहायला हव्या. योग्य आकार निवडण्यासाठी टेंपल (चष्म्याची कमान), डोळ्यांचा आकार आणि ब्रिज (दोन्ही लेन्सला जोडणारा हिस्सा जो नाकावर फे्रमला टिकून ठेवतो)च्या आकारवर लक्ष देऊन फे्रमची निवड करा. 

*  फ्रेमचा आकार -
आपल्या चेहऱ्याच्या आकार आणि गरजेनूसार एवियेटर, वेफे यरर्स, राउंडेड, कॅट-आय, रैक्टेंगल, ओवल शेप, रॅपअराउंड या ओवरसाइज आकाराच्या फ्रेमची निवड करू शकता. योग्य आकार आणि योग्य मापानेच आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. 

*  फ्रेमचा रंग- 
काळ्या रंगाची फे्रम सर्वांनाच शोभू न दिसते. मात्र तरीही फे्रमचा रंग निवडताना चेहºयाच्या रंगाचा विचार करणे गरजेचे आहे. जर आपल्या चेहºयाचा रंग कृष्णवर्णीय असल्यास त्यांना विविध गडद रंगाच्या फ्रेम शोभून दिसतात. चष्म्याच्या फ्रेममध्ये काळा आणि ब्राऊन रंग अधिक पसंत केला जातोच. पण त्यासोबतच आकाशी, क्रीम, बिस्किट कलर, बेबी पिंक, लाइट आॅरेंज असे पेस्टल शेड्स ट्रेण्डमध्ये आहेत. ‘ओपेक फ्रेम’चे म्हणजेच पारदर्शी फ्रेमचे चष्मेही बाजारात पहायला मिळतात. अ‍ॅनिमल प्रिंटचे चष्मेसुद्धा बाजारात पाहायला मिळतात.

* उन्हापासून संरक्षण-
व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठीच नव्हेतर सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून चष्म्याचा वापर केला जातो. उन्हाळ्यात सूर्याचे किरणे डोळ्यांवर पडल्यास डोळ्यांना इजा तर होतेच शिवाय डोळ्याचे विविध आजार उद्भवतात. यासाठी उन्हाळ्यात विविध सनग्लासेस मार्केटमध्ये उपलब्ध होत असतात. तरुण-तरुणींपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वचजण उन्हाळ्यात सनग्लासेसचा वापर करताना दिसतात. विशेष म्हणजे सनग्लासेसचा वापर भावनांना लपविण्यासाठीदेखील केला जातो. रडणे किंवा त्यामुळे डोळ्यांना आलेला लालसरपणा लपविला जातो. 

 ravindra.more@lokmat.com

Web Title: Increases the confidence of using glasses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.