आॅनलाईन गेमिंगमुळे वाढतो निकालाचा टक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2016 11:46 AM2016-08-10T11:46:25+5:302016-08-10T17:16:25+5:30
आॅनलाईन गेम्स खेळल्याने कुमारवयीन मुलांची शैक्षणिक प्रगती वाढण्यास हातभार लागू शकतो.
त सन्तास इंटरनेटवर गुंग असलेल्या मुलांना आईवडिलांचा ओरडा ठरलेलाच असतो. आणि जर गेम खेळत असाल तर तुमचे काही खैर नाही. ‘माठ्या मोबाईल सोड आणि अभ्यास कर’ असं दटावलं जातं. तुमच्या घरीदेखील हेच घडत असेल तर ही बातमी तुमच्या पालकांना वाचून दाखवा.
आॅस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, आॅनलाईन गेम्स खेळल्याने कुमारवयीन मुलांची शैक्षणिक प्रगती वाढण्यास हातभार लागू शकतो. आहे का नाही खुश खबर! याउलट मात्र जर फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर जर अधिक वेळ दडवला तर निकाल घसरलाच म्हणून समजा.
संशोधकांनी १५ वर्षीय विद्यार्थ्यांच्या ‘प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट अॅसेसमेंट’ (पिसा) चाचणीमधील कागगिरीचे विश्लेषण करून इंटरनेटचा वापर आणि शैक्षणिक प्रगती यांचा संबंध काय याचा अभ्यास केला. ‘पिसा’ ही वैश्विक मान्यमात प्राप्त शैक्षणिक मुल्यांकन चाचणी आहे.
अध्ययनाअंती असे दिसून आले की, जे विद्यार्थाी इंटनेटवर आॅनलाईन गेम्स खेळतात त्यांनी चाचणीमध्ये चांगली कामगिरी केली तर सोशल नेटवर्किं ग साईट्सवर वेळ घालवणार्या विद्यार्थ्यांना गणित, वाचन व विज्ञानात इतरांपेक्षा कमी गुण मिळाले.
एवढेच नाही तर जे विद्यार्थी मुळातच गणित व विज्ञानात हुशार असतात, त्यांचा आॅनलाईन गेम्स खेळण्याकडे कल अधिक असतो. आता कोणत्याही प्रकारे इंटरनेवर वेळ घालवणे म्हणजे अभ्यासाच्या वेळेला कमी करणेच आलेच. पण आॅनलाईन गेम्स खेळताना जे कौशल्य विद्यार्थी शाळेत शिकतात ते अधिक परफेक्ट करण्यास मदत होते.