पुरुषप्रधान क्षेत्रात वाढतोय महिलांचा दबदबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2016 01:00 PM2016-07-31T13:00:43+5:302016-07-31T18:30:43+5:30

फ्रान्समध्ये विज्ञान शिक्षकाच्या नोकरीसाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात येते.

Increasing women's dominance in women's domination! | पुरुषप्रधान क्षेत्रात वाढतोय महिलांचा दबदबा!

पुरुषप्रधान क्षेत्रात वाढतोय महिलांचा दबदबा!

Next
त्री-पुरूष समानसंधी या चवीने चर्चिल्या आणि अभ्यासल्या जाणाऱ्या विषयात एक आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहे. फ्रान्समध्ये विज्ञान शिक्षकाच्या नोकरीसाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त प्राधान्य देण्यात येते तर साहित्य व परदेशी भाषांसारख्या महिलाप्रधान क्षेत्रांमध्ये पुरुषांना झुकते माप देण्यात येते.

गणित आणि विज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये महिलांना डावलण्यात येते अशा सर्वसाधरण समजुतीच्या विरोधात जाणारे हे निष्कर्ष आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित इ. क्षेत्रांत महिलांचा टक्का वाढवण्याच्या मुद्यावर नव्याने विचार करण्याची गरज आहे का, असा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित होतो.

महिलांप्रती असणाऱ्या पूर्वग्रहांच्या आधारावर त्यांना डावलण्यात येत आणि म्हणून वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी असल्याचा युक्तीवाद केला जातो. याविषयी सखोल अभ्यास करण्यासाठी ‘पॅरिस स्कू ल आॅफ इकोनॉमिक्स’च्या थॉमस ब्रेडा आणि मेलिना हिलियन यांनी फ्रान्समध्ये माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षकांची भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला.

या दोघांनी २००६ -१३ दरम्यान घेण्यात आलेल्या लेखी व मौखिक परीक्षांच्या निकालाचा तुलनात्मक अभ्यास केला असता त्यांना दिसून आले की, विज्ञानशिक्षकाच्या पदासाठी मौखिक परीक्षेच्या परीक्षकांनी महिलांना पुरुषांपेक्षा अधिक गुण दिले. तसेच महिलांचे वर्चस्व असणाऱ्या पदांसाठी मात्र पुरुषांना प्राधान्य देण्यात आले. आहे का नाही कमाल.

Web Title: Increasing women's dominance in women's domination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.