​प्रमाणात फेसबुकचा वापर वाढवतो तुमचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 06:23 PM2016-11-01T18:23:41+5:302016-11-01T18:23:41+5:30

सुमारे १.२ कोटी सोशल मीडिया युजर्सचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Increasing your Facebook usage in the scale of your life | ​प्रमाणात फेसबुकचा वापर वाढवतो तुमचे आयुष्य

​प्रमाणात फेसबुकचा वापर वाढवतो तुमचे आयुष्य

Next
नलाईन जगताचे अनेक नवनवीन फायदे आता समोर येऊ लागले आहेत. फेसबुकचा प्रमाणात आणि नियंत्रित वापर केल्यास आयुर्मान वाढते, असे एका संशोधनातून दिसून आले. सुमारे १.२ कोटी सोशल मीडिया युजर्सचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

समाजामध्ये सक्रीय असणाऱ्या लोकांचे आयुष्य जास्त असते, असे संशोधकांना माहित होते. परंतु आॅनलाईन वावर असेल तर कसा फरक पडतो याविषयी अध्ययन करणारे हे पहिलेच संशोधन आहे. 

कॅलिफोर्निया सॅन डिएगो विद्यापीठातील विल्यम हॉब्स यांनी माहिती दिली की, ‘आॅनलाईन वावर जर नियंत्रित आणि पुरेशा प्रमणात असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. आॅनलाईन आणि आॅफलाईन सक्रीयता एकमेकांना पुरक असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्यमान वाढते. परंतु फेसबुकचा गरजेपेक्षा जास्त वापर आणि लोकांशी प्रत्यक्ष मिसळण्याचे नगण्य प्रमाण यामुळे तोटे सहन करावे लागतात.

                                  Social Media

प्रा. जेम्स फॉउलर  यांनी सांगितले की, ‘फेसबुकचा संतुलित वापर करणारे जवळपास सर्वच लोकांमध्ये अकाली मृत्यू येण्याचे प्रमाण फार कमी आढळले. कॅलिफोर्नियातील फेसबुक युजर्सचा ‘कॅलिफोर्निया डिपार्टमेंट आॅफ पब्लिक हेल्थ’च्या डेटाशी तुलनात्मक अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला.

Web Title: Increasing your Facebook usage in the scale of your life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.