भारतीय शेफ ठरली अमेरिकेत रिअॅलिटी शोची विजेती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2016 02:10 PM2016-08-11T14:10:16+5:302016-08-11T19:40:16+5:30
भारतीय शेफ आरती संपत अमेरिकेतील कुकिंग रिअॅलिटी शो ‘चॉप्ड’ची विजेती बनली आहे.
भ रतीय शेफ आरती संपत अमेरिकेतील कुकिंग रिअॅलिटी शो ‘चॉप्ड’ची विजेती बनली आहे. शोच्या अंतिम भागात तिच्या नावाची घोषणा करण्यात आली. प्रथमच एखाद्या भारतीय शेफने अशा प्रकारची स्पर्धा जिंकली आहे.
आरती सध्या सुप्रसिद्ध शेफ विकास खन्नाच्या ‘जुनून’ रेस्ट्राँमध्ये प्रमुख शेफ म्हणून काम करते. विजयानंतर तिने प्रतिक्रिया दिली की, माझ्या नावाची घोषणा झाल्यावर मनावरचा खूप मोठा ताण हलका झाला. मी मोकळा श्वास घेतला. आतापर्यंतच्या सर्वात कठिण आव्हानाला मी सामोरे गेले होते. त्यामध्ये यशस्वी झाल्यावर निश्चितच खूप छान वाटतेय.
केवळ २० मिनिटांत स्वादिष्ट डिश बनवायची आणि त्यानंतर परीक्षांची टीका ऐकणे ही सोपी गोष्ट नाही. मी यश मिळवल्याचे समाधान तर आहेतच; पण आता येथून पुढे असणारे आव्हाने पेलण्याची नवी उमेद मला मिळाली आहे. भारतात असणाºया स्त्रीयांना प्रेरित करण्याचा माझा हेतू सफल झाला, असे देखील ती म्हणाली.
लहानपणापासूनच आरतीला स्वयंपाकात रुची होती. विविध प्रकारचे पदार्थ बनवून, त्यांच्यामध्ये काय सुधारणा करता येईल याचे ती मुंबईत राहत्या घरी प्रयोग करायची. त्यातूनच तिचा शेफ बनण्याचा प्रवास सुरू झाला.