​भारतीयांचा ‘इगो’ खूपच जास्त - नारायण मुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2016 02:52 PM2016-08-16T14:52:16+5:302016-08-16T20:22:16+5:30

आपल्या देशासमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे नागरिकांच्या ‘इगो’ची आहे.

India's 'Eggo' too much - Narayan idol | ​भारतीयांचा ‘इगो’ खूपच जास्त - नारायण मुर्ती

​भारतीयांचा ‘इगो’ खूपच जास्त - नारायण मुर्ती

Next
हंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो’ हे जरी माहीत असले तरी अहंकार काही केल्या व्यक्तीमधून जात नाही. आणि भारतीय असेल तर जातच नाही. असे आम्ही नाही म्हणत तर ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मुर्तींना वाटते. स्वातंत्र्यदिना निमित्त त्यांनी दिलेल्या एका भाषणात भारतीयांच्या ‘इगो’बद्दल चिंता व्यक्त केली.

चौथे ‘इंडिपेंडन्स डे लिट लाईव्ह’ व्याख्यान त्यांनी मुंबईत केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या देशासमोर अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. परंतु माझ्या मते सर्वात मोठी समस्या म्हणजे आपली व्यवस्था किंवा राजकीय नेत्यांची अनास्था नसून नागरिकांच्या ‘इगो’ची आहे. भारतीय लोकांमध्ये प्रचंड अहंकार आहे. तो कमी करण्याची गरज आहे.

बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘देशाच्या विकासाला हातभार लावायचा असेल तर अहंकार बाजुला ठेवून मोकळ्या मनाने आणि मुक्त विचारांनी आपल्यापेक्षा चांगले काम करणाºयांचा आदर करायला शिका. सरकारसोबत काम करण्याच्या माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मी सांगू शकतो की, गोष्टी ज्या वेगाने बदलायला हव्यात तसे होताना दिसत नाहीए. ‘मलाच सर्व काही येतं’ अशी लोकांची वृत्ती असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे अवघड होऊन बसते.’
ego
काही स्वत:चे व इतरांचे अनुभव शेअर करून मुर्ती यांनी आपला मुद्दा मांडला. ते सांगतात, ‘कोणतेही नवीन गोष्ट आपण मांडली की, ते तर आम्हाला महिती होतं, आम्ही ते जाणतो, असं मानून त्या गोष्टीचं महत्त्व कमी क रण्याची वृत्ती आपल्या देशात जास्त आहे.’

Web Title: India's 'Eggo' too much - Narayan idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.