​घर सांभाळताना इंद्रा नुयींची व्हायची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2016 12:25 AM2016-04-10T00:25:03+5:302016-04-09T17:25:03+5:30

स्वत:च्या करियरसाठी मला अनेक निर्णय असे घ्यावे लागले जे कठीण आहे. 

Indra Niyyi's time to handle the house when it comes to handling the house | ​घर सांभाळताना इंद्रा नुयींची व्हायची तारांबळ

​घर सांभाळताना इंद्रा नुयींची व्हायची तारांबळ

Next
त्री म्हटले की, शोषित, अबला अशी विशेषणे लावली जातात. परंतु पुरषप्रधान समाजात स्वत:च्या कर्तृत्वावर जगभर ठसा उमटविणाऱ्या मोजक्या स्त्रियांपैकी एक म्हणजे इंद्रा नुशी. पेप्सिकोच्या सीईओ म्हणून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

‘वुमेन इन द वर्ल्ड समीट’मध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, ‘स्वत:च्या करियरसाठी मला अनेक निर्णय असे घ्यावे लागले जे माझ्यासाठीच काय पण कोणत्याही स्त्रीसाठी कठीण आहे. करियर की कुटुंब या दुविधेमध्ये मी होते. मी करियरला निवडले म्हणून मला कधीच पश्चाताप झाला नाही. फक्त माझी मुलं मोठी होत होती तेव्हा त्यांना वेळ देता आले नाही याचेच दु:ख आहे.’

एस अँड पी 500 कंपन्यांच्या सगळ्या सीईओंमध्ये केवळ चार टक्के महिला आहे. त्यांपैकी एक असणाºया इंद्रा नुयी म्हणतात, माझ्या मुलांना मी नेहमी सांगते की तुम्ही आज घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुमच्या मुलांना भोगावे लागतात.

यशस्वी महिलाउद्योजग म्हणून इंद्रा नुयींचे नाव सर्वत्र घेतले जाते. त्यांच्या ‘बिझनेस अ‍ॅक्युमन’ वाखाण्याजोगे आहे. पण मुलांना वेळ न देण्याची सल त्यांना आहे. करियर आणि घर दोन्ही सांभाळणे खरंच खूप अवघड गोष्ट आहे.

Web Title: Indra Niyyi's time to handle the house when it comes to handling the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.