सिंहाच्या शिकारीवर ‘दाहक’ डॉक्युमेंटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2016 04:25 AM2016-04-01T04:25:29+5:302016-03-31T21:31:45+5:30

डॅडव्ह हेरल आणि टॉमर अल्मागोर या दिग्दर्शक जोडगळीने ‘किंग आॅफ बिस्टस् : द स्टोरी आॅफ लायन ट्रॉफी हंटिंग’ नावाचा माहितीपट तयार केला आहे. 

The 'inflammatory' documentary on the lion's hunter | सिंहाच्या शिकारीवर ‘दाहक’ डॉक्युमेंटरी

सिंहाच्या शिकारीवर ‘दाहक’ डॉक्युमेंटरी

Next
शी खातर सिंहाची शिकार करण्यासाठी सर्व जगभरातून लोक आफ्रिके ला जातात. गेल्या वर्षी अमेरिकेतील एका डॉक्टरने जगप्रसिद्ध सिंह ‘सिसिल’च्या शिकारीसाठी पैसे दिल्याची घटना घडल्यानंतर आफ्रि केत बक्षीसासाठी होणाºया सिंहाच्या शिकारीचे प्रकरण प्रचंड गाजले.

याच धरतीवर डॅडव्ह हेरल आणि टॉमर अल्मागोर या दिग्दर्शक जोडगळीने ‘किंग आॅफ बिस्टस् : द स्टोरी आॅफ लायन ट्रॉफी हंटिंग’ नावाचा माहितीपट तयार केला आहे.

हेरल सांगतो की, ‘या माहितीपटातून सिंहाच्या शिकारीबद्दल अद्याप ज्ञात नसलेले अनेक तथ्य आणि धक्कादायक महिती बाहेर आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे.’

नामिबिया आणि टांझानियामध्ये या माहितीपटाची शूटिंग झाली आहे. तेथील आर्थिक, भौगोलिक, खाद्यपदार्थांवरून होणारे संघर्ष यामध्ये पाहायला मिळणार आहे.

एक शिकारी म्हणतो, जंगलातील सिंह म्हणजे डिस्ने चित्रपटातील ‘सिंबा’ नाही. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते.

अल्मागोर सांगतो, खेळ म्हणून सिंहाची शिकारी होणे थांबवी या उद्देशाने आम्ही या माहितीपटाची सुरुवात केली होती. मात्र, हळूहळू यामागचे राजनैतिक आणि आर्थिक कारणे आणि जटीलता समोर आली. वन्यजीवांचे संरक्षण करणे खरोखरच काळाची गरज आहे.

Web Title: The 'inflammatory' documentary on the lion's hunter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.