मितभाषी लोकांनी असा सुरू करावा संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:31+5:302016-02-04T14:33:08+5:30

मितभाषी लोकांनी असा सुरू करावा संवाद मितभाषी लोकांचा स्वभाव हा लाजरा आणि शांत असतो.

Interacting people should start the dialogue | मितभाषी लोकांनी असा सुरू करावा संवाद

मितभाषी लोकांनी असा सुरू करावा संवाद

googlenewsNext
तभाषी लोकांनी असा सुरू करावा संवाद
मितभाषी लोकांचा स्वभाव हा लाजरा आणि शांत असतो. दुसर्‍यांशी बोलणे त्यांना खूप अवघड वाटते. परंतु आजच्या युगात कामासंबंधी अनोळखी लोकांशी बोलण्याची वारंवार गरज पडते. अशावेळी मितभाषीपणा तुमच्या करिअरला मारक ठरू शकतो. लोकांशी संभाषण करणे जर तुम्हाला कठिण काम वाटत असेल तर पुढील चार टीप्सचा नक्कीच वापर करा.
१. न्युनगंड बाळगू नका
तुम्ही जर आधीच मनाशी पक्के केले की आपल्याला बोलताच येणार नाही तर तुम्ही कधीच बोलू शकणार नाही. त्यामुळे सर्वात आधी असा नकारात्मक विचार काढून टाका. अनोळखी व्यक्तीला जाणून घेण्याची, त्याचे विचार समजून घेण्याची ही फार चांगली संधी असते. त्यामुळे स्वत:हून अनोळखी लोकांशी बोला. संभाषणात आघाडी घेणारे लोक नेहमीच दुसर्‍यांना इम्प्रेस करतात.
२. इंटरेस्ट दाखवा
समोरची व्यक्ती काय बोलतोय याकडे नीट लक्ष द्या. त्याने विचारलेल्या प्रश्नांना मनापासून उत्तरे द्या. तुम्ही जर प्रामाणिकपणे संभाषणात रस घेतला तर समोरचादेखील तेवढय़ाच उत्सुकतेने बोलतो. अनोळखी लोकांशी बोलणे तसे पाहिले तर फार अवघड गोष्ट नाही. तुम्ही जर मनापासून ठरवले तर संभाषण आपोआप सुरू होते. त्यासाठी गरज आहे ती उत्सुकता दाखवण्याची.
३. प्रश्न विचारा
कमी बोलणार्‍या लोकांची खरी अडचण म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलण्यास कशी सुरुवात करावी, त्याला भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणावे, ही असते. यावर बेस्ट ऑप्शन म्हणजे त्याला प्रश्न विचारा. यामुळे तुम्हाला कमी बोलावे लागेल. दुसर्‍या व्यक्तीला संभाषणाच्या केंद्रस्थानी ठेवल्याने तोदेखील तुमच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देईल. अशाच पद्धतीने हळूहळू बोलणे वाढत असते.
४. एका शब्दात उत्तर देऊ नका
समोरच्या व्यक्तीला जास्त प्रश्नसुद्धा नका विचारू. थोडे तुमच्याबद्दलही त्याला सांगा. त्याने विचारलेल्या प्रश्नांना एका शब्दात उत्तर देऊ नका. त्यामुळे संभाषण पुढे सकरण्यास अडचण येते. व्यक्तीचा स्वभाव, वेळ, स्थळ पाहून बोलाण्याचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती काय करते हे जाणल्यानंतर त्यासंबंधी बोलणे अधिक सोयस्कर असते.

Web Title: Interacting people should start the dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.