INTERESTING : या ‘५’ गोष्टी आपल्या जवळ असतील तर आपण आहात लकी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 07:58 AM2017-06-01T07:58:18+5:302017-06-01T15:00:45+5:30
जाणून घ्या आपणाजवळ या गोष्टी आहेत की नाही....
Next
दुसऱ्याचे सुख पाहून आपण दु:खी होतो, याच आपली चुक नसून तो मनुष्य स्वभावच आहे, असे म्हटले जाते. मात्र ही सवय आपल्या स्वभावासाठी चांगली नाही. आज आम्ही आपणास आपल्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुमच्या जवळ असतील तर आपण खरच लकी आहात.
चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...!
* असे म्हणतात की, ‘आरोग्यम् धन संपदा..’ आपल्या जवळ हेल्थ आहे तर वेल्थ आहे. निरोगी आरोग्याद्वारे आपण आपले सर्व स्वप्ने साकार करु शकतो.
* या जगात बरेच लोक आहेत जे पोरके आहेत आणि एकाकी जीवन जगत आहेत, मात्र आपल्याजवळ परिवार आहे, म्हणून आपण खूप लकी आहात.
* आपल्या जवळ चांगले मित्र असतील तर आपण खूपच लकी आहात. या जगात विश्वासू मित्र मिळणे हा देखील नशिबाचा भाग आहे.
* डोक्यावर कर्ज असणे वाईट गोष्ट आहे. काय झाले आपल्याकडे सर्व सुख-सुविधा नाहीत, डोक्यावर कर्जाचा डोंगर तर नाही ना.
* लहान असो की मोठा, आपल्याजवळ जॉब तर आहे ना. बरेचजण बेरोजगारीने त्रस्त आहेत. त्यांच्यापेक्षा आपल्याजवळ उत्पन्नाचे साधन तर आहे ना. म्हणून आपण लकी आहेत.