INTERESTING : जाणून घ्या, मुलींना कसे मुले आवडतात !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2017 09:31 AM2017-04-01T09:31:54+5:302017-04-01T15:04:00+5:30

आपण दिसायला स्मार्ट आहेत आणि तरीही मुली आपल्याकडे लक्ष देत नाहीत, तर आपल्या व्यवहारात काही बदल करा. आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत, ज्याने मुली इंप्रेस होतील.

INTERESTING: Learn how children love kids! | INTERESTING : जाणून घ्या, मुलींना कसे मुले आवडतात !

INTERESTING : जाणून घ्या, मुलींना कसे मुले आवडतात !

Next
ong>-Ravindra More
तशी सर्वांची आपापली आवड-निवड असते मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येक मुलगी एका मुलामध्ये पाहणे पसंत करते. मुलींना कसे मुले आवडतात याचे उत्तर नाही आहे. मात्र विशेषत: मुलींना आदर करणारे, कोमल मनाचे आणि संस्कारी मुले जास्त आवडतात. याशिवाय कायम फ्रेश दिसणारे, आनंदी स्वभावाचे, प्रत्येकाचा सन्मान करणारे, सभ्यतापूर्वक वागणारे, प्रशंसा करणारे असे गुण असणारे मुलेदेखील मुलींना जास्त आवडतात. आपण दिसायला स्मार्ट आहेत आणि तरीही मुली आपल्याकडे लक्ष देत नाहीत, तर आपल्या व्यवहारात काही बदल करा. आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत, ज्याने मुली इंप्रेस होतील. 

सभ्य मुले
बहुतांश मुली सभ्य म्हणजेच जेंटलमेन मुलांकडे जास्त आकर्षित होतात. जे स्वभावाने खूपच साधे आणि सरळ आहेत, मात्र गरज असेल तेव्हा आक्रमक ही होतील. मुलांचा सभ्यपणाच मुलींना आपल्याकडे आकर्षिक करतो. मुलींना लाजाळू मुलेही आवडतात. जर तो सर्वांशी लाजाळूपणाने वागतो, फक्त त्याच मुलीसमोर मनमोकळे बोलत असेल तर तिच्या ह्रदयात जागा बनविणे सोपे आहे. महिलांना चांगल्या व्यक्तीपेक्षा सक्षम मनुष्य बनण्याचा प्रयत्न करणारे पुरुष जास्त आकर्षक वाटतात. महिलांना व्यक्तिगत विकास पसंत आहे आणि त्या विचारशील तसेच संवेंदनशील पुरुष जास्त आवडतात. 

काळजी घेणारा
मुलींना काळजी घेणारा मुलगा जास्त आवडतो. काळजी घेण्याच्या प्रवृत्तीमुळे तिला नेहमी असे वाटते की, हा आपली नेहमी काळजी घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीला कूल डूड मुलेही जास्त आवडतात, शिवाय इंटेलएक्चु अल मुलेदेखील चांगले वाटतात. मग आतापासून पुस्तके वाचणे सुरु करा, यामुळे एखादी चांगली मुलगी तुम्हाला पसंत करायला लागू शकते. 

नेहमी प्रसन्न असणारा
मुलींना नेहमी प्रसन्न असणारे मुलेही खूप आवडतात. कारण आपल्या चेहऱ्यावरील चमकमुळे आपल्या स्वभावाची ओळख होते. जर आपला चेहरा नेहमी प्रसन्न असेल तर आपण जोशपूर्ण दिसता आणि यामुळेच मुली आकर्षित होतात. लोकांना फक्त हसणे माहित असेत, हसवणं नाही. मात्र जो आपल्या चेहऱ्याची नव्हे तर दुसऱ्याच्या चेहऱ्याची काळजी घेतो, असे मुले मुलींना विशेष आकर्षित करतात.  
 
महिलांचा आदर करणारा
मुलींना महिलांचा आदर करणारे मुलेदेखील खूप आवडतात. महिलांना सन्मान दिल्याने आपले महिलांबद्दलचे विचार समजतात. मुलींना भावनिक मुलेही खूप पसंत पडतात, कारण भावनिक असेल तर तो आपल्यावर प्रेम करेल, मला समजून घेईल असे तिचे मत असते. शिवाय तिच्यातील उणिवा जाणून घेणाराही तिला जास्त आवडतो.

तटस्थ मुले
विशेषत: मुली नेहमी अशा मुलांकडे लक्ष देतात जे त्यांना भाव देत नाहीत. असे मुले जे मुलींच्या बाबतीत तटस्थ असतात, त्यांना मुलींमध्ये खास रुचि नसते. जर मुलींना पाहून आपली तिच्याकडे लगेच वळण्याची प्रवृत्ती असेल तर सांभाळा आणि आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. एकदमच मुलींसमोर असा व्यवहार करू नका, ज्यामुळे तिला समजेल की, तुम्ही तिला पसंत करता. आपल्यातील विश्वास काहीही करु शकतो. हाच विचार मुलींचाही असतो. केवळ स्वत:वर विश्वास ठेवणारे मुले मुलींच्या ह्रदयात स्थान निर्माण करतात. 

दबंग
मुलींना मुलांचा दबंग स्वभाव आणि त्याच्यातला आत्मविश्वास खूपच आवडतो. संकुचित वृत्ती असणारे मुले तर मुलींना अजिबात आवडत नाहीत. यासाठी कधीही बोलताना लाजायचे नाही आणि स्पष्ट तसेच मनमोकळेपणाने आपले म्हणणे मांडायचे. संताप करणे वाईट गोष्ट नाही आहे, मात्र त्या संतापाला नियंत्रणात न ठेवणे सर्वात वाईट गोष्ट आहे. जर तिच्याशी गप्पा मारण्याची तुमची इच्छा असेल तर यात वाईट काहीही नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. खऱ्या गप्पा आणि जास्तवेळ बोलत राहणे दोघांमध्ये जवळीकता साधण्यास मदत करते.  

गंभीर स्वभावाचा
स्वभावाने गंंभीर प्रवृत्तीचे मुले मुलींना खूप आवडतात. मुलींना जे आय लव्ह यू म्हणत त्यांच्या मागे फिरतात असे मुले अजिबात आवडत नाही. मुलींना विशेषत: आत्मविश्वासू मुले अधिक आवडतात. जर तुम्ही तिला आपल्या भावना एकदा सांगितल्या आहेत, तर प्रत्येक वेळी तिच्याकडून उत्तर मागू नका. ती काही कारणाने त्रस्त असेल तर तिला सल्ला देण्याऐवजी तिचे म्हणणे ऐका. असे केल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल. 

 

Web Title: INTERESTING: Learn how children love kids!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.