Interesting : ...म्हणून अशा महिलांकडे आकर्षित होतात पुरुष !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 09:06 AM2017-04-13T09:06:31+5:302017-04-13T14:36:31+5:30
अशा मुलींचा मेंदू जास्त उंचीच्या मुलींच्या तुलनेने खूपच तरतरीत असतोे शिवाय पार्टनरला जास्त सुखी ठेवतात.
Next
आकर्षक दिसण्यासाठी उंची खूप महत्त्वाची ठरते असे आपणास वाटत असेल तर ही बातमी वाचून आपले मत नक्कीच बदलेल. एका संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, पुरुषांना लहान उंचीच्या महिला अधिक आकर्षक वाटतात. यूनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ टेक्सासच्या रिपोर्टनुसार, आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्या उंचीपेक्षा जास्त उंचीच्या मुलींच्या तुलनेने पुरुष ज्यांची उंची त्यांच्यापेक्षा कमी आहे त्या महिलांना भावनात्मक दृष्टिने अधिक पसंत करतात.
छातीपर्यंत पोहोचणे
असे म्हटले जाते की, लहान उंचीच्या महिला पुरुषांच्या छातीपर्यंत सहज पोहचतात. अशावेळी त्यांना अलिंगन देताना खूप चांगले वाटते.
मेंदू असतो तरतरीत
बू्रनेल यूनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्ट नुसार अशा मुलींचा मेंदू जास्त उंचीच्या मुलींच्या तुलनेने खूपच तरतरीत असतोे.
रोमॅँटिक स्वभाव असतो
रिपोर्टनुसार कमी उंचीच्या महिला पार्टनरला जास्त सुखी ठेवतात.
काळजी घेण्यात तत्पर
रोमॅँटिक नेचरबरोबरच कमी उंचीच्या मुली पुरुषांची जास्त काळजी घेतात. त्यामुळे पुरुष अशा महिलांसोबत अधिक भावनिक जवळीकता साधतात.