INTERESTING : ‘या’ सहा प्रकारचे पुरुष धोका देण्यात असतात पटाईत !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2017 09:33 AM2017-03-26T09:33:37+5:302017-03-26T15:03:37+5:30

आपल्या प्रेमात असा विश्वासघात होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या जोडीदाराच्या वागणुकीवर लक्ष द्यायला हवे.

INTERESTING: 'These' six types of men are given risk! | INTERESTING : ‘या’ सहा प्रकारचे पुरुष धोका देण्यात असतात पटाईत !

INTERESTING : ‘या’ सहा प्रकारचे पुरुष धोका देण्यात असतात पटाईत !

Next
ong>-Ravindra More
प्रत्येकाला वाटते की, आपला पार्टनर आपल्याशी एकनिष्ट राहून त्याने आयुष्यभर विश्वास संपादन करावा. मात्र समोरचा व्यक्ती कधी धोका देईल आणि तुमची ही इच्छा एका क्षणात कधी उद्धवस्त होईल याबाबत काहीच सांगता येणार नाही. आपल्या प्रेमात असा विश्वासघात होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या जोडीदाराच्या वागणुकीवर लक्ष द्यायला हवे. आज आम्ही आम्ही आपणास अशा सहा पुरुषांविषयी सांगणार आहोत जे तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात.

* जो स्वत:च्या आईचा आदर करीत नाही
जो व्यक्ती स्वत:च्या आईचा नेहमी अनादर करतो तो तुमच्यासोबत दीर्घकाळ राहू शकेलच याची शाश्वती नसते. याउलट जे मुले आपल्या आईच्या सान्निध्यात राहतात ते मुले जेव्हा साथ देण्याचा प्रश्न येता तेव्हा तुमच्या पाठीशी उभी राहतात. यासाठी तुमचा मित्र आपल्या आईशी उद्धटपणे वागतो असे तुम्हाला कळले असेल तर अशा मुलापासून दूर राहिलेले बरे.

* गुपित कायम ठेवणारे 
प्रत्येक व्यक्ती काही गोष्टी इतरांपासून लपवून ठेवते. परंतु तुमचा जोडीदार नेहमीच प्रत्येक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवतोय असे तुम्हाला वाटत असेल तर सावधान. असे पुरुष तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतील. तुमची सगळी गुपितं जाणून घेतील पण स्वत:विषयी काही सांगणार नाही.

* तुमच्याकडे आकर्षित न होणे 
तुम्हाला त्याने सहजपणे स्वत:कडे आकर्षित करून घेतले. परंतु तो मात्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला प्रतिसाद देत नाही, असे असेल तर त्याच्या मनात इतर कोणी आहे का? हे तपासून घ्या.

* मी विसरलो 
जर तुमचा जोडीदार तुमच्याशी निगडीत प्रत्येक डेट विसरून जात असेल, शेवटच्या क्षणी प्लान कॅन्सल करत असेल, तर लक्षात घ्या की तो नक्की तुम्हाला फसवतोय. कदाचित त्याच्याजवळ तुमच्यापेक्षा चांगला पर्याय असेल. जो तुम्हाला प्राधान्य देत नाही तो तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो. अशा पुरुषांपासून दूर राहा.

* पझेसिव्ह व अति प्रोटेक्टिव्ह व्यक्ती 
अशा लोकांना आपल्या जोडीदाराला आपल्या ताब्यात ठेवणे आवडते. तुमच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यात त्यांना रस असतो. तुमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करून तुमचे वैयक्तिक स्वातंत्र्य असे लोक हिरावून घेतात.

*नाते लपवून ठेवणारे
तो तुमचे व त्याचे नाते लोकांसमोर येऊ देत नाही. तो तुमच्या मित्रांना भेटतो. परंतु आपल्या मित्रांशी तुम्हाला भेटवत नाही. जर असे असेल तर तो तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो.

Web Title: INTERESTING: 'These' six types of men are given risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.