Interesting : वयामधील अंतर सांगते, लग्न किती काळापर्यंत टिकेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2017 09:22 AM2017-04-05T09:22:06+5:302017-04-05T14:52:06+5:30
आपल्या दोघांच्या वयात किती अंतर आहे, आणि आपण किती काळ सोबत राहू शकतो हे जाणून घ्या...
Next
लग्नादरम्यान जोडीदारांमधल्या वयाच्या अंतराचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडत असतो. हे एका संशोधनातून स्पष्ट झाली आहे. लग्न, विवाह, मॅरेज...प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच. आपणास माहित आहे का की, लग्न करणाऱ्या जोडीदारांच्या वयामध्ये किती अंतर असावे? कारण बऱ्याचदा आपण पाहतो की, नवरदेव ५० वयाचा असतो आणि नवरी २२ वर्षाची. तसे लग्न करणाऱ्या दोघांना वयाची बाब जास्त महत्त्वाची वाटत नाही. मात्र इमोरी विश्वविद्यालयाचे एंर्ड्यू फ्रांसेस आणि ह्यूगो मिआलोन यांच्या संशोधनानूसार बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
संशोधनात ३ हजार कपल्सचा सहभाग होता. संशोधनानूसार, कपल्समध्ये वयाचे जेवढे अंतर असते, लग्न तुटण्याची शक्यता तेवढीच जास्त असते. जर कपल्समध्ये वयाचे अंतर पाच वर्षाचे असेल तर असे लग्न तुटण्याची शक्यता १८ टक्कयाने वाढते.
जर हे अंतर २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ९५ टक्के लग्न तुटतात. मात्र जर लग्न करतेवेळी दोघांच्या वयामध्ये फक्त एका वर्षाचे असेल तर लग्न तुटण्याची शक्यता फक्त तीनच टक्के असते.