​INTERESTING : लग्नाच्या एक रात्र अगोदर काय विचार करतात मुली?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2017 06:11 AM2017-05-24T06:11:19+5:302017-05-24T11:41:19+5:30

लोकांना वाटते की, लग्नाच्या एक रात्र अगोदर मुली फक्त हनिमून डेस्टिनेशनच्या बाबतीत विचार करीत असेल. मात्र असे अजिबात नसते.

INTERESTING: What do girls think of a night before the wedding? | ​INTERESTING : लग्नाच्या एक रात्र अगोदर काय विचार करतात मुली?

​INTERESTING : लग्नाच्या एक रात्र अगोदर काय विचार करतात मुली?

googlenewsNext
ादी मुलगी लग्न बंधनात अडकत असेल तर तिच्या मनात शेकडो प्रश्न घोळत असतात. लग्नाच्या पहिल्या रात्री तर तिचे ह्रदयाचे जोर जोराने ठोके पडतात. या दरम्यान तिच्या मनात येणारे प्रश्न कधी आपल्या लग्न झालेल्या मैत्रिणींना सांगते तर कधी मौनच धारण करते. चला जाणून घेऊया ती लग्नाच्या एक रात्री अगोदर काय विचार करते. 

* जोडीदार
मुली आपल्या लग्नाच्या एक रात्र अगोदर आपल्या जोडीदाराच्या बाबतीत गंभीर विचार करतात की, होणारा जोडीदार माझ्या सोबत आयुष्यभर असणार की नाही? शिवाय माझी निवड माझ्या आयुष्यासाठी योग्य असेल की नाही? असा विचारदेखील ती करते.  

* लग्न करण्याची घाई तर झाली नाही ना ?
लग्नाबाबत प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. लोकांना वाटते की, लग्नाच्या एक रात्र अगोदर मुली फक्त हनिमून डेस्टिनेशनच्या बाबतीत विचार करीत असेल. मात्र असे अजिबात नसते. लग्नाच्या एक रात्र अगोदर तिच्या मनात एक भीती असते ती म्हणजे की, लग्नाच्या बाबतीत तिने घाई तर केली नाही ना? लग्नासारखी एवढी मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी खरच मी सक्षम आहे का? लग्नासाठी अजून मला आई-वडिलांकडून थोडा वेळ मागायला हवा होता का? असे कित्येक प्रश्न तिच्या मनात येत असतात. 

* सासरवाडीचे लोक मला मनापासून स्वीकार करतील की नाही?
मुलींच्या मनात लग्नाच्या एक रात्र अगोदर हा देखील विचार येतो की, माझ्या सासरवाडीचे लोक मला मनापासून स्वीकार करतील की नाही? माझ्या आई-वडिलांसारखे माझ्यावर प्रेम करतील की नाही? मुली सर्वात जास्त त्रस्त याच विचाराने त्रस्त असतात की, होणाऱ्या सासुची वागणूक कशी असेल? आणि मी त्यांना चांगल्या पद्धतीने समजू शकेल की नाही? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात येत असतात.

Also Read : ​OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !

Web Title: INTERESTING: What do girls think of a night before the wedding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.