​बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2016 07:52 AM2016-07-06T07:52:33+5:302016-07-06T13:22:33+5:30

२९ ते ३१ जुलै दरम्यान बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येणार आहे.

The International Transgender Arts Festival in Bengaluru | ​बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’

​बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’

Next
म ३७७ रद्द करून समलैंगिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी एलजीबीटी समुदाय मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सॉफ्टेवेअर सिटी बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येणार आहे. देशाविदेशातील अनेक ट्रान्सजेंडर कलाकार २९ ते ३१ जुलै दरम्यान बेंगालुरूच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे होणाऱ्या या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. 

यामध्ये मंजम्मा जोगिथी यांच्या नेृतृत्त्वात कर्नाटकमधील जोगप्पा समुदायातील कलाकार,  संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेले पहिले ट्रान्सजेंडर कलाकार नर्तकी नटराज, मल्लिका गिरी पानीकर (सिंगापूर), वर्षा वर्धना (मलेशिया) आणि वासुकी वेल्कनो यांचा सामावेश असणार. महोत्सवात भरतनाट्यम, कुचिपुडी, मोहिनीयट्टम आणि कथ्थकसारखे शास्त्रीय नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे.

महोत्सवात संगीत कॉन्सर्ट, काव्यवाचन, नाटक, कलाप्रदर्शनदेखील आयोजित केले जाणार आहे. महोत्सवाचा मुख्य हेतू हा लैंगिकतेविषयी सकारात्मक संदेश देणे, तिच्याविषयी असणाऱ्या समस्यांपेक्षा तिचे अस्तित्त्व साजरे केले जावे हा आहे. अतिशय काळजीपूर्वक प्रोफेशनल पद्धतीने महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. कलाकाराच्या निवडीमध्येही खूप लक्ष देण्यात आले.

लोकांनी यावे, पाहावे आणि समजुन घ्यावे असे आम्हाला वाटते, असे आयोजकांनी सांगितले. केवळ एका महोत्सवाने बदल होणार नाही; पण ही एक सकारात्मक सुरूवात नक्कीच असेल.

Web Title: The International Transgender Arts Festival in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.