असा असावा तुमचा रेझ्युमे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2016 03:55 PM2016-07-09T15:55:13+5:302016-07-09T21:25:13+5:30

लेखिका वेंडी एनेलोव्ह यांनी आजच्या ‘अल्ट्रा-टेक्नो’ युगात, सर्वोत्कृष्ट रेझ्युमे कसा असावा याबाबत काही टिप्स शेअर केल्या आहेत.

It should be your resume! | असा असावा तुमचा रेझ्युमे!

असा असावा तुमचा रेझ्युमे!

Next
काय नुकतेच कॉलेज पास-आऊट मित्रांनो! नोकरीचा शोध सुरू झाला की नाही. नातेवाईक, शेजारीपाजारी आणि घरच्यांनी एव्हाना नोकरीविषयी विचारणासुद्धा सुरू केली असेल. 

पूर्वी छान होतं ना!

आपले काका-मामा किंवा वडिलांचे मित्र एखाद्या आॅफिसातील साहेबांना शिफारस करत आणि केवळ त्यांच्या शब्दावर नोकरी मिळायची. पण आज केवळ शिफारस किंवा शब्दावर नोकरी मिळत नाही. ती मिळते तुमचे टॅलेंट आणि शिक्षण पाहून. तुमचे हे टॅलेंट कंपनीला मुलाखती आधी तुमच्या ‘रेझ्युमे’वरून दिसत असते. त्यामुळे ‘जॉब हंट’मध्ये रेझ्युमे आपले सर्वात प्रभावी शस्त्र आहे.

प्रत्येक एचआर मॅनेजर किंवा रिक्रुटमेंट आॅफिसर एकच सांगेन की, हजारो जॉब अ‍ॅप्लिकेशन्सच्या ढिगार्‍यात तुमचा रेझ्युमे वेगळा उठून दिसला तरच मुलाखतीला बोलावणे येण्याची शक्यता जास्त असते. रेझ्युमेवर केवळ सहा सेकंद नजर फिरवून मॅनेजर्स/कंपनी तुमची पात्रता ठरवतात, असे ‘द लॅडर्स’ संस्थेने केलेल्या एका संशोधनात दिसून आले. 

एवढ्या कमी वेळात जर ‘बिग इम्प्रेशन’ निर्माण करायचे असेल तर तुमच्या पारंपरिक रेझ्युमे येथे प्रभावी ठरणार नाही. ‘मॉडर्नाइज युअर रेझ्युमे : गेट नोटिस्ड, गेट हायर्ड’ या पुस्तकाच्या लेखिका वेंडी एनेलोव्ह यांनी आजच्या ‘अल्ट्रा-टेक्नो’ युगात, जिथे काही कंपन्या सॉफ्टवेयरद्वारे रेझ्युमे पडताळणी करतात, तिथे सर्वोत्कृष्ट रेझ्युमे कसा असावा याबाबत काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्या अशा -

1. संपर्क माहितीला प्राधान्य द्या

कंपन्यांचे मॅनेजर्स अतिव्यस्त असतात. त्यामुळे रेझ्युमेत तुमचा ई-मेल हायपरलिंक करणे त्यांच्यासाठी अधिक सोयिस्कर आहे. केवळ एका क्लिकवर ते तुमच्याशी संपर्क करू शकतील. कॉन्टॅक्टमध्ये ‘लिंक्डइन’ प्रोफाईलची अ‍ॅक्टिव्ह लिंकदेखील द्यावी. 

2. रंग आणि डिझाईन

तुमच्या फिल्डनुसार रेझ्युमेचा लूक असावा. (उदा. ग्राफिक डिझाईनरसारखी क्रिएटिव्ह फिल्ड असेल रेझ्युमे सजावटीला अकिध वाव आहे.) प्रोफेशनल दिसण्यासाठी केवळ हेडर्स रंगीत करा. इतर माहिती काळ्या रंगातच राहू द्या. ‘टाईम्स न्यू रोमन’ फॉन्ट आता कालबाधित झाला आहे. त्याऐवजी कॅम्ब्रिया, कॅलिब्री किंवा जॉर्जिया हे फॉन्ट वापरावेत.

3. आॅब्जेक्टिव्ह आता आऊटडेटेड

रेझ्युमेमधील ‘आॅब्जेक्टिव्ह’ कॉलम आता अप्रचलित झाला आहे. कंपनीचे लक्ष आकर्षित करण्यासाठी रेझ्युमेची सुरूवात ‘प्रोफेशनल सिनॉप्सिस’ने करा. यामध्ये अनुभव, जॉब हिस्ट्री, करिअर अचिव्हमेंट्स यांची माहिती नमुद करा. 

4. नजर खिळवून ठेवा

कॉम्प्युटर स्क्रीनवर वरून सलग खालीपर्यंत कोणी वाचत नाही. केवळ नजर फिरवली जाते. त्यामुळे रेझ्युमेची रचना अशी करा की, पाहणार्‍याची नजर योग्य ठिकाणी खिळून राहिल. तुमचे ‘प्लस पॉर्इंट’ त्याच्या नजेरस पडावे म्हणून त्यांना बोल्ड किंवा अधोरेखित करा.

CV review

5. क्रिएव्हिट टर्म वापरा

रेझ्युमेमध्ये तुमची भाषा प्रमाण व प्रभावी हवी. एखाद्या गोष्टीला अधिक क्रिएटिव्हपणे मांडू शकतो का? या शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरता येईल का? याचा विचार करा. म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर, ‘कस्टमर सर्व्हिस’ ऐवजी ‘क्लायंट रिलेशन्स’ असे लिहिले तर नक्कीच अधिक प्रभाव पडेल.

6. ‘स्किल’ लिहिताना कौशल्य दाखवा!

उमेदवार त्याचे कौशल्य कामात कसे वापरतो यामध्ये कंपनीला अधिक रस असतो. त्यामुळे रेझ्युमेमध्ये वेगळ्या कॉलममध्ये तुमचे कौशल्य लिहिण्याऐवजी ते ‘वर्क एक्सपेरियन्स’मध्ये सोदाहरण लिहा. अपवाद :  विशिष्ट कौशल्यावर आधारित नोकरीसाठी (उदा. आयटी सेक्टर) अर्ज करताना ‘स्किल’ कॉलम राहू द्यावा.

7. रेझ्युमेची लांबी

बर्‍याच जणांना असा प्रश्न असतो की, रेझ्युमे किती मोठा किंवा किती पानांचा असावा. प्रचलित गैरसमज असा आहे की, रेझ्युमे जेवढा जास्त मोठा तेवढा इंप्रेसिव्ह . पण तसे नसते. दहा-वीस किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असलेला उमेदवाराने दोन-तीन पानांचा रेझ्युमे बनवला तर ते योग्य आहे. पण कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या पदवीधराने तसे करणे धोक्याची घंटा आहे.

8. थोडक्यात; पण महत्त्वाचे

अति शब्दबंबाळ रेझ्युमे वाचण्यास वेळ कोणाकडे आहे? त्यामुळी तशी चुक करू नये. केवळ महत्त्वाची तेवढीच माहिती रेझ्युमेमध्ये असावी. तीदेखील मुद्देसुद आणि बुलेट्सने दर्शवलेली. अ‍ॅक्टिव्ह व्हर्ब (सकर्मक क्रियापदे), तत्सम क्षेत्राशी सुसंगत संक्षिप्त रुपांचा वापर करण्यावर भर द्यावा.

तुमच्याकडे यापेक्षा वेगळ्या ‘रेझ्युमे टिप्स’ असतील कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सर्वांशी शेअर करा. तुमच्या उज्ज्वल करिअरसाठी आमच्याकडून शुभेच्छा.

career-path

Web Title: It should be your resume!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.