​पूर्ण वेळ पोकेमॉन खेळण्यासाठी त्याने सोडली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2016 09:22 AM2016-07-17T09:22:44+5:302016-07-17T14:52:44+5:30

न्युझिलँडमध्ये राहणाऱ्या टॉम कुरी या व्यक्तीने पूर्ण वेळ ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी आपली चांगली नोकरी सोडली.

Job left to play pokemon full time | ​पूर्ण वेळ पोकेमॉन खेळण्यासाठी त्याने सोडली नोकरी

​पूर्ण वेळ पोकेमॉन खेळण्यासाठी त्याने सोडली नोकरी

Next
ोकेमॉन गो’ची क्रेझ आता सर्व सीमा तोडून लोकांच्या डोक्यात शिरली आहे. दररोज काही ना काही विचित्र व आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ‘पोकेमॉन गो’ गेमुळे किंवा त्यासाठी घडताना दिसताहेत. आता हेच पाहा ना. न्युझिलँडमध्ये राहणाऱ्या टॉम कुरी या व्यक्तीने पूर्ण वेळ ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी आपली चांगली नोकरी सोडली.

आॅकलँडपासून जवळच असणाऱ्या हिबिस्कस कोस्ट येथे तो बारटेंडर म्हणून तो काम करत असे. तो म्हणतो, ‘गेममधील सर्व १५१ पोकेमॉन्स पकडण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी नोकरी सोडून पूर्णवेळ गेम खेळण्यासाठी देणार आहे. माझ्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला.’

नोकरीचा राजीनामा देताना मॅनेजरला जेव्हा खेर कारण कळाले की, तेव्हा टॉमला शुभेच्छा देताना तो म्हणाल की, पोकेमॉन हंट ट्रीपसाठी बेस्ट लक. हा निर्णय तुझ्या फायद्याचा ठरो हीच सदिच्छा. टॉमच्या वडिलांनीदेखील त्याला मेसेज पाठवून त्याच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणतात, मला माहिती होतं टॉम की, तू एकदिवस खूप प्रसिद्ध होशील.

आतापर्यंत टॉमने ९१ पोकेमॉन्स पकडले असून हे मिशन पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा त्यातील सर्वात चांगला भाग आहे, असे तो म्हणतो. मी कधी ज्या ठिकाणी किंवा शहरांत गेलो नसतो तेथे या गेममुळे मी गेलो. नव्या लोकांशी भेटलो, त्यांच्याशी बोललो. हे माझ्यासाठी अत्यंत नवीन आणि एक्सायटिंग आहे.

न्यूझिलँडमध्ये तो आता खूप प्रसिद्ध झाला आहे. लोक त्याला फेसबुकवर शुभेच्छा देतात. त्याला प्रोत्साहन देतात. तो म्हणतो लवकरच चाहते मला ‘फॅनमेल’ पाठवतील यात काही शंका नाही. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या पद्धतीने मी जगाशी जोडले गेलो. एकदा का मी सर्व पोकेमॉन्स पकडले की त्यानंतर मी आॅकलँडला परत जाऊन नोकरी शोधेन नाही तर नवा व्यवसाय करेन. माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव मी घेत आहे. सो लेट्स एन्जॉय इट!!

Tom Currie
Photo Source : Facebook

Web Title: Job left to play pokemon full time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.