द जंगल बुकला सेंसारचे यू/ए सर्टिफिकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2016 04:19 AM2016-04-09T04:19:02+5:302016-04-08T21:19:02+5:30
डिज्नीचा बहुचर्चित चित्रपट ‘द जंगल बुक’ला सेंसार बोर्डने यू/ए सर्टिफिकेट दिले आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे बॉलीवुड आणि सोशल मीडियावर प्रचंड टीका केली जात आहे.
Next
ड ज्नीचा बहुचर्चित चित्रपट ‘द जंगल बुक’ला सेंसार बोर्डने यू/ए सर्टिफिकेट दिले आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे बॉलीवुड आणि सोशल मीडियावर प्रचंड टीका केली जात आहे. वाल्ट डिज्नी पिक्चर्सचा ‘ द जंगल बुक’ हा चित्रपट रुडयार्ड किपलिंगच्या कथेवर आधारित आहे. भारतात ८ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. यू/ए सर्टिफिकेटचा अर्थ म्हणजे हा चित्रपट वडिलधाºयांच्या उपस्थितीतच बघावा लागणार आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, हा चित्रपट प्रचंड भितीदायक असल्यानेच हा निर्णय घ्यावा लागला. मात्र बॉलीवुडमध्ये सेंसारच्या या निर्णयामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. निर्माता मुकेश भट्ट यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सेंसार बोर्डाच्या या निर्णयाचा गांभीर्याने विचार करायला हवा. तर अभिनेता आयुष्यमान खुराना याने देखील सेंसारच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करीत, ‘नशिब चित्रपटातील नग्न वानर आणि चिंपाजींना बघुन बोर्डाने ए सर्टिफिकेट दिले नाही, असे म्हटले आहे.