‘जांभई’ देण्यावरून कळते ‘सहानुभूती’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2016 03:05 AM2016-04-01T03:05:50+5:302016-03-31T20:05:50+5:30

 अनेक संशोधनातून जांभई आणि सहानुभूतीची भावाना यांचा परस्पर संबंध समोर आला आहे.

'Junking' gives 'sympathy' | ‘जांभई’ देण्यावरून कळते ‘सहानुभूती’

‘जांभई’ देण्यावरून कळते ‘सहानुभूती’

Next
े पाहिले गेले तर सार्वजनिक ठिकाणी जांभई देणे चांगले मानले जात नाही. परंतु आता या क्षणी ही बातमी वाचताना तुम्ही छोटासा प्रयोग करून पाहा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती तुमच्याकडे बघत असेल तर जांभई द्या आणि पाहा की तोदेखील जांभई देतो का?

त्याने जर जांभई दिली तर त्याला तुमच्या विषयी सहानुभूती आहे, असे मानण्यास काही हरकत नाही. यासंबंधी झालेल्या अनेक संशोधनातून जांभई आणि सहानुभूतीची भावाना यांचा परस्पर संबंध समोर आला आहे.

दुसऱ्याने जांभई दिल्यावर तुम्हाला जांभई येण्याला जांभईचा संसर्ग’ म्हणतात. आॅटिझम किंवा मानसिक संतुलन बिघाडलेले लोकांसमोर तुम्ही जांभई दिली तर ते जांभई देत नाही. उलट तुमच्या कुटुंबातील सदस्यांना लगेच जांभईचा संसर्ग होतो.

याचाच अर्थ की, भावनिकरित्या तुमच्याशी अधिक जवळ असणाऱ्या लोकांना हा जांभईचा संसर्ग होतो. अभ्यासातून असेदेखील दिसूना आले की, अनोळखी व्यक्तींना तुम्ही जांभई दिल्यावर जांभई येण्याची शक्यता फार कमी असते.

महिलांमध्ये इतरांकरिता पुरुषांपेक्षा जास्त सहानुभूती वाटत असते. म्हणून तर महिला समोर तुम्ही जांभई दिल्यावर त्यांनादेखील जांभई येते. साधरणत: वयाच्या चार ते पाचव्या वर्षांपासून मानवात सहानुभूतीची भावना निर्माण होते.

Web Title: 'Junking' gives 'sympathy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.