.. अशा बॉसपासून जरा जपूनच राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:16 AM2016-01-16T01:16:30+5:302016-02-06T10:24:58+5:30

भावनांशी खेळ : स्वत:च्या आणि दुसर्‍यांच्या भावनांशी खेळणे ही कुठल्याही सायकोपॅथ बॉसची सर्वात आवड...

Just be careful with such a boss! | .. अशा बॉसपासून जरा जपूनच राहा!

.. अशा बॉसपासून जरा जपूनच राहा!

Next
१.
भावनांशी खेळ : स्वत:च्या आणि दुसर्‍यांच्या भावनांशी खेळणे ही कुठल्याही सायकोपॅथ बॉसची सर्वात आवडती ट्रीक असते. परिस्थितीनुसार रंग बदलणारे हे लोक धिट, चार्मिंग आणि बोलण्यात चतुर असतात. स्वत:च्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणाच्या त्यांची तयारी असते.
२. प्रत्येकावर नियंत्रण : अशी माणसे त्यांच्या हाताखालील कर्मचारी हे केवळ बुद्धिबळ पटावरील प्यादे आहेत असे मानतात. कामापुरता लोकांचा वापर करून घ्यायचा आणि नंतर त्यांना सोडून द्यायचे, असे त्यांचे धोरण असते. ऑफिसमधील प्रत्येक गोष्टीवर आणि कर्मचार्‍यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे ही 'ऑर्गनायझेशन सायकोपॅथ'ची खासियत असते.
३. श्रेय लाटणे : तुम्ही मन लावून काम करता. मेहनत, प्रामाणिकपणा आणि टॅलेंटमुळे बॉसच्या मर्जीतील म्हणून तुमची ओळख आहे. मात्र, तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे श्रेय बॉस स्वत: घेत असेल तर समजून जावे की काही तरी गडबड आहे.
४. खापर फोडणे : यशाचे श्रेय लाटण्यात सर्वात पुढे असणारा हा बॉस स्वत:च्या हातून झालेल्या सर्व चुकांचे खापर त्यांच्या हाताखाली काम करणार्‍यांवर फोडायला नेहमी तयार असतो. स्वत:ची मान वाचविण्यासाठी इतरांचा बळी द्यायला ते मागेपुढे बघत नाही.
५. अतिमहत्त्वकांक्षी : उच्चपद, बढती, सत्ता, प्रभाव या गोष्टी 'ऑर्गनायझेशन सायकोपॅथ'ला सर्वांत जास्त आकर्षित करतात. अतिमहत्त्वाकांक्षी हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. तुमच्या डोक्यावर पाय देऊन स्वत:चा फायदा करून घेणारा तुमचा बॉस असेल तर वेळीच जॉब बदलणे गरजेचे आहे.

Web Title: Just be careful with such a boss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.