कमला हॅरिस यांनी शपधविधीसाठी निवडलेला जांभळा ड्रेस कोणी डिजाईन केलाय माहित्येय का?
By manali.bagul | Published: January 22, 2021 02:27 PM2021-01-22T14:27:14+5:302021-01-22T14:31:07+5:30
मूळची चेन्नईची असलेली आई आणि जमैकातील आफ्रिकन वडिलांची ५६ वर्षीय मुलगी कमला हॅरिस यांनी देशातील पहिली महिला उपराष्ट्राध्यक्ष बनून इतिहास रचला आहे.
भारतीय मूळ असलेल्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी बुधवारी ऐतिहासिक शपथग्रहण कार्यक्रमात (America first female vice president) अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली. मूळची चेन्नईची असलेली आई आणि जमैकातील आफ्रिकन वडिलांची ५६ वर्षीय मुलगी कमला हॅरिस यांनी देशातील पहिली महिला उपराष्ट्राध्यक्ष बनून इतिहास रचला आहे.
हॅरिस या अमेरिकेच्या ४९ व्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्यासह त्या काम पाहणार आहे. शपधविधीच्या खास प्रसंगी कमला हॅरिस यांनी डार्क जांभळ्या रंगाचा फॉर्मल ड्रेस परिधान केला होता. यासह त्यांनी मॅचिंग कोटसुद्धा घातला होता. जांभळ्या रंगाच्या या खास ड्रेसची सगळीकडेच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यांचा हा ड्रेस या ऐतिहासिक दिवसासाठी दोन डिजायनर्सनी डिजाईन केला होता.
यावेळी हॅरिस यांचे पती डॉ. एमहॉफ यांनी राल्फ लॉरेन सूट घातला होता. त्याच वेळी, ज्यो बायडन यांनी शपथविधीसाठी अमेरिकन डिझायनिंगचा डार्क ब्लू सूट आणि कोट घातला होता. शपथविधी सोहळ्यात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस अगदी साध्या आणि डिसेंट ड्रेसअपमध्ये दिसून आल्या. कमला यांनी नेकपीस आणि ब्रोच पिनसह एक मॅचिंग कोट घातला होता. कमला हॅरिस आणि ज्यो बायडन दोघांनीही कॅपिटल हिलवर राल्फ लॉरेन सूट निवडला.
पतीला एका ब्लाइंड डेटवर भेटल्या होत्या कमला हॅरिस, ते काय करतात आणि किती आहे त्यांची संपत्ती?
कमला हॅरिस यांनी शपथविधीसाठी घातलेला ड्रेस त्यांचे डिजायनर क्रिस्टोफर जॉन रोजर्स (Christopher John Rogers) आणि सर्जियो हडसन (Sergio Hudson) यांनी डिजाईन केला होता. न्यूयॉर्कचे रहिवासी असलेले रोजर्स एक तरूण डिजायनर आहेत. तर सर्जियो दक्षिण कैरोलियानातील प्रसिद्ध डिजायनर आहेत. कमला हॅरिस यांच्या आधीही रोजर्स आणि सर्जियो यांच्याकडून मिशेल ओबामा आणि बेयोंस यांनी ड्रेस डिजाईन करून घेतला होता.