केटी पेरी सर्वात महागडी संगीतकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:10 AM2016-01-16T01:10:36+5:302016-02-10T05:49:42+5:30
केटी पेरी ही २0१५ मधील सर्वात महागडी संगीतकार ठरली आहे. सर्वाधिक मानधन घेणार्या संगीतकारांची यादी फोर्ब्स मॅगझिनने नुकतीच जाहीर केली
Next
ेरीने या वर्षात तब्बल १३५ दशलक्ष डॉलरची कमाई करीत अग्रस्थान पटकावले आहे. तिने नुकतीच ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, नॉर्थ अमेरिका व लॅटिन अमेरिकेतील 'वर्ल्ड टूर' केली, त्यामुळे ही घसघशीत कमाई झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. प्रत्येक कार्यक्रमादरम्यान तिने २0 लाख डॉलरवर कमाई केली आहे. रेकॉर्डची विक्री, इतर कार्यक्रम, इव्हेंट यांद्वारे ही उलाढाल झाली आहे. फोर्बने अमेरिकाज 'पॉप एक्स्पोर्ट' या शब्दांत तिचा गौरव केला आहे. या जबरदस्त कमाईमुळे गतवर्षीपेक्षा तिने तब्बल २३ क्रमांकाने प्रगती करीत टॉपर बनण्याचा मान मिळवला, असे एसशोबिझने म्हटले आहे.
केटी पेरीने म्हटले आहे, 'आता संगीत बदलते आहे. त्यानुसार आपणासही बदल करावा लागत आहे.' सर्वाधिक मानधन घेणार्यांत आता ती तिसर्या क्रमांकावर आली आहे. बॉक्सर कोयाल मेवेदर ज्युनिअर व मॅनी पेस्किको हे प्रथम व दुसर्या क्रमांकावर आहेत. सर्वाधिक मानधन घेणारे संगीतकार (कमाई दशलक्ष डॉलर) ग्रॅथ ब्रुक (९0), टेलर स्विफ्ट (८0), केल्व्हिन हॅरिस (६६), जस्टिन टीमबर्कले (६३.५).