गर्लफ्रेंडला ‘हॅपी’ ठेवण्यासाठी....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 05:29 PM2016-10-20T17:29:30+5:302016-10-20T17:29:30+5:30
आपल्याला गर्लफ्रेंड असावी असे अनेक तरूणांचे स्वप्न असते.
Next
* गर्लफ्रेंडच्या आवडीच्या वस्तू व गरजा काय आहेत हे ओळखून त्याची लिस्ट बनवा आणि विशिष्ट प्रसंगी त्यानुसार भेटवस्तू देऊन सरप्राईज द्या. अशाने गर्लफ्रेंडच्या आनंदात नक्कीच चारपटीने भर पडेल.
* आपली काही चूक नसतानाही पुढाकार घेऊन माफी मागा. अशाने तिच्या नजरेत तुमची किंमत वाढेल. यानंतर जरी तुम्ही तिच्यावर नाराज झाला किंवा तिला काही सांगत असाल तर ती तुमचे सर्व काही शांतपणे ऐकून घेईल.
* तरुणींना स्वत:च्या चुका चांगल्या प्रकारे माहीत असतात, अशावेळी त्यांच्या चुका दाखवू नका. अशाने त्या चिडतात, नात्यात कटूता निर्माण होते. त्यांना चुकांची जाणीव होऊ द्या.
* कधी कधी त्यांच्यावरील प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. फेसबुक वॉलवर जाऊन एक खास मेसेज लिहा. त्यांचा आदर कमी होईल असे काहीही लिहू नका.
* जर काहीतरी कारणाने ती आपल्यावर नाराज असेल तर तिच्या आवडीचे एखादे गिफ्ट द्या. तिची मनापासून स्तुती करा. परिणामी तुमच्यावरचा राग तत्काळ दूर होईल व तिही आनंदी होईल.
* तुमची गर्लफ्रेंड जर रागात तुम्हाला बरे वाईट बोलली असेल, तर त्या गोष्टी गंभीरपणे घेऊ नका. तिच्या रागाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर चूक तुमची असेल तर माफी मागण्यात कमीपणा मानू नका.
* भांडण जर खूप वाढले असेल तर तुम्ही थोडे शांत व्हा. तिचा राग शांत करुन तिला डिनर डेटवर घेऊन जा.
* गर्लफ्रेंडला कधीही नावे ठेऊ नका. अशाने तिला राग तर येतोच पण तुमच्याबद्दल तिच्या मनात नकारात्मक भावना तयार होतात.
* शॉपिंगला जाताना तिने पसंत केलेले कपडे किंवा इतर वस्तूंबाबत सल्ला देऊ नका. तिला जे आवडेल ते पाहून उत्तम आहे असे म्हणा.
* रिलेशनशीपमध्ये पार्टनरला थोडा स्पेस द्या. बाहेर फिरु देण्याचा, त्यांना मनासारखे जगण्याचा आणि मौज-मस्ती करण्याची संधी द्या. स्पेस दिल्याने रिलेशनशीपमध्ये प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.