कुत्रा पाळणे आरोग्यासाठी उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2016 03:42 PM2016-04-16T15:42:52+5:302016-04-16T21:12:52+5:30

 ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत. त्यांचा रक्तदाब व कोलेस्ट्रॉलही नियंत्रीत राहू शकतो.

Keeping Dogs Best for Health | कुत्रा पाळणे आरोग्यासाठी उत्तम

कुत्रा पाळणे आरोग्यासाठी उत्तम

Next
 
्याचबरोबर वजन वाढण्याचीही शक्यता राहत नाही. हे हार्वर्ड विद्यापीठाच्या अलीकडील एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे. हार्ट केअर फाऊंडेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष तथा आईएमचे जनरल सेक्रेटरी डॉ. के.के. अग्रवाल यांनी सांगितले की, यामध्ये अनेक शोध समोर आले असून, ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत. त्यांचा टरिगलीस्राइडचा स्तर कमी होतो. यामुळे बीपी व वजनही वाढत नाही. कारण की, कुत्रामुळे शरीराची गती वाढून तणाव कमी होतो. यामुळे घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहते. कुत्रामुळे आपल्याला बाहेर जाता येते. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटामीन डी मिळते. त्यामुळे शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले. नियमीतपणे कुत्रासोबत खेळण्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रीत राहतो. पाळीव प्राणी व आजाराचा कोणताच संबंध नाही. परंतु, त्यांच्यामुळे आपण तणावात राहत नाही. कोणताही तणाव नसला की मनुष्य उत्तमप्रकारे जीवन जगू शकतो, असेही डॉ अग्रवाल म्हणाले.
जे लोक कुत्रा  किंवा मांजर पाळतात. त्यांच्यासाठी ते पाळीव प्राणी नसतो तर एक चांगला मित्रही असतो. आपल्याकडेही एखादा पाळीवर कुत्रा असेल तर तो सुद्धा आपला तणाव कमी करु शकतो. व आपण आपले जीवन आनंदात घालवू शकतात.

 

Web Title: Keeping Dogs Best for Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.