‘फॉर्च्यून’च्या यादीत केजरीवालांचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2016 05:04 AM2016-03-26T05:04:11+5:302016-03-25T22:04:11+5:30
‘फॉर्च्यून’ मॅगझीनने जगातील ५० ग्रेटेस्ट लीडर्सची यादी जाहिर केली आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ४२ वे स्थान मिळवले आहे.
Next
‘ ॉर्च्यून’ मॅगझीनने जगातील ५० ग्रेटेस्ट लीडर्सची यादी जाहिर केली आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ४२ वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना दूर सारत केजरीवाल यांनी हे स्थान पटकावले आहे. गतवर्षी या यादीत मोदी आणि सत्यार्थी या दोघांचीही नावे होती. यावर्षी या दोघांनाही यादीत स्थान मिळू शकलेले नाही. ‘फॉर्च्यून’ने दिल्लीत आॅड-ईव्हन फॉर्म्यूला लागू केल्याबद्दल केजरीवालांची प्रशंसा केली आहे. ‘फॉर्च्यून’च्या गतवर्षीच्या यादीत मोदी ५ व्या तर सत्यार्थी २८ व्या स्थानी होते. यावर्षी या यादीत स्थान मिळवणारे केजरीवाल हे एकमेव भारतीय ठरले आहेत.
या यादीत ‘अॅमेझॉन’चे सीईओ जॅफ बेजोस यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी ते या यादीत २७ व्या क्रमांकावर होते. यावर्षी सगळ्यांना बाजूला सारत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. बेजोस यांच्या नेतृत्वाखाली ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ जगातील सर्वात मोठा ई-रिटेलर बनला आहे.