किम राहतेय १६७ कोटींच्या घरात ‘फुकट’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2016 01:18 PM2016-08-31T13:18:04+5:302016-08-31T18:48:04+5:30
दोघांना ‘एअरबीएनबी’ या कंपनीने मॅनहटनस्थित एका आलिशान पेंटहाऊसमध्ये पूर्णपणे मोफत राहण्याची परवानगी दिली आहे.
Next
ज ाच्या आर्थिक घडामोडींची राजधानी म्हणजे न्यूयॉर्क. भारतासाठी ज्याप्रमाणे मुंबई आहे, त्याप्रमाणे जगासाठी न्यूयॉर्क शहर आहे. आकाशाला भिडणाºया उंचच्या उंच इमारतींच्या या शहरात उच्चभ्रू वस्तीमध्ये पेंटहाऊसमध्ये राहाण्याचे लोकांचे स्वप्न असते. प्रसिद्ध टीव्ही स्टार किम कार्दाशियनचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. तेदेखील ‘फुकट’!
किम आणि तिचा नवरा कान्ये वेस्ट या दोघांना ‘एअरबीएनबी’ या कंपनीने मॅनहटनस्थित एका आलिशान पेंटहाऊसमध्ये पूर्णपणे मोफत राहण्याची परवानगी दिली आहे. पाच बेडरूम आणि सहा बाथरुम असलेल्या या पेंटहाऊसची किंमत २५ मिलियन डॉलर्स (सुमारे १६७ कोटी रु.) एवढी आहे. खासगी टेरेस, रुफटॉप स्विमिंगपूल, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा अशा सर्व आधूनिक राजेशाही सुविधा या घरामध्ये आहेत.
किम या पेंटहाऊसमध्ये राहायला आली असून येत्या तीन महिन्यांसाठी हेच तिचे घर असणार आहे. एक रात्र या पेंटहाऊसमध्ये थांबण्यासाठी १० हजार डॉलर्स (६.७ लाख रु.) किराया द्यावा लागतो. मात्र किम व कान्येसाठी कंपनीने एकही रुपया आकारला नाही. किमला फक्त तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या घराचे फोटो शेअर करण्याची अट घालण्यात आली आहे.