KISS DAY SPECIAL : प्रेमात ‘किस’ करण्याअगोदर थोडी मस्ती गरजेची !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 10:38 AM2017-02-11T10:38:58+5:302017-02-11T16:08:58+5:30
या दिवशी प्रत्येक प्रेमी आपल्या पार्टनरचे चुंबन घेऊ इच्छितो. जर आपणही कुणाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या सहकाºयाच्या चुंबन घेण्याचा विचार करीत असाल, मात्र हिंमत होत नसेल तर चुंबन करण्याअगोदर थोडी मजा मस्ती गरजेची असते.
Next
जगभर ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा होत आहे. या वीक मधला आज १३ रोजीचा ‘किस डे’ अर्थात चुंबन दिवसदेखील मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक प्रेमी आपल्या पार्टनरचे चुंबन घेऊ इच्छितो. जर आपणही कुणाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या सहकाºयाच्या चुंबन घेण्याचा विचार करीत असाल, मात्र हिंमत होत नसेल तर चुंबन करण्याअगोदर थोडी मजा मस्ती गरजेची असते.
* प्रेमात एक चुंबन तर हवेच
प्रेमात तर प्रेमवीरांना चुंबन घेण्यासाठी अशा कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते मात्र प्रेमींना चुंबन घेण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या पार्टनरच्या ह्रदयाचे ठोके वाढविण्यासाठी पार्टनरला एक चुंबन तर आवश्यक आहे. आपण आपल्या पार्टनरला किती प्रेम करतो याची जाणीव चुंबन घेतल्याने होत असते.
* चुंबन घेण्याअगोदर प्रेमाची जाणीव द्या
आपण आपल्या पार्टनरचे अजूनपर्यंत चुंबन घेतले नसेल आणि घेण्याचा विचार करीत असाल तर त्या अगोदर आपल्या पार्टनरला आपण खूपच प्रेम करतो याची जाणीव होऊ द्या. ही जाणीव झाल्याने आपला पार्टनर स्वत:हून आपणास चुंबन देईल.
* गुडबाय किस पासून करा सुरूवात
आपल्या पार्टनरचा आपण पहिल्यांदाच चुंबन घेण्याचा विचार करीत असाल तर जेव्हा आपण आपल्या पार्टनरपासून लांब जात असाल तेव्हा आपल्या पार्टनरला गुडबायच्या निमित्ताने ‘गुडबाय किस’ करु शकता. याने आपला पार्टनर एक्सायटेड तर होईल शिवाय आपल्याजवळ अजून काही वेळ बसण्याची इच्छा व्यक्त करेल.
* पहिले चुंबन प्रेमाचे
जर आपण पहिल्यांदाच चुंबन करीत असाल तर अचानक खूप हार्श व हार्ड किस ओठांवर करु नये. याने त्याला त्रास होऊ शकतो. त्याऐवजी आपल्या पार्टनरच्या गालावर किंवा कपाळावर अलगद प्रेमाचे चुंबन घ्यावे. जेणेकरुन त्याला आपल्या प्रेमाची जाणीव होईल आणि आपण त्याच्यावर किती प्रेम करतो हेदेखील कळेल.
* स्टोलन किस ठरेल आठवणीतला
आपण कधी पार्टनरला स्टोलन किस केला आहे का? असे चुंबन जे अचानक पार्टनरला न सांगता केला जातो. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हे चुंबन घेतले जाते. याने आपल्या पार्टनरला वाईटदेखील वाटणार नाही आणि आपल्या भावनाही त्याला समजतील.
* किस करताना घ्या काळजी
आपल्या पार्टनरला जर आपण पहिल्यांदाच किस करीत असाल तर बºयाच वेळपर्यंत नसावा. काही सेकंदानंतर पार्टनरला चुंबनाची जाणीव करुन हळूवार वेगळे व्हावे. चुंबन घेणे म्हणजे फक्त आपल्या प्रेमाची जाणीव करुन देणे होय. त्यात कुठल्याही प्रकारची अश्लीलता नको.
Also Read : PROMISE DAY SPECIAL: कसमें वादे निभायेंगे हम !
: VALENTINE SPECIAL : वयाने लहान व्यक्तीवर प्रेम करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या !