द लास्ट ‘अमेरिकन आयडॉल’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2016 02:18 AM2016-04-09T02:18:48+5:302016-04-08T19:18:48+5:30

 मिसिसिपी शहरातून आलेल्या हार्मनला ‘अमेरिकन आयडॉल’चा मुकुट मिळाला.

The Last 'American Idol' | द लास्ट ‘अमेरिकन आयडॉल’

द लास्ट ‘अमेरिकन आयडॉल’

Next
प्रसिद्ध सिंगिंग रिअ‍ॅलिटी टीव्ही शोचे पंधरावे पर्व नुकतेच संपले. 2002 मध्ये सुरू झालेल्या या शोने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडित काढले. यंदाचे शेवटचे पर्व असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती की, अखेरचा विजेता कोण ठरणार.

‘द अल्टिमेट फायनल’मध्ये ट्रेंड हार्मनने आणि ला पोर्शामध्ये स्पर्धा होती. दोघांचेही चाहते आपापल्या आवडत्या गायकाला शेवटचा ‘अमेरिकन आयडॉल’ बनविण्यासाठी सज्ज होते. अखेरे अमेरिकेने ट्रेंड हार्मनला पसंती दिली आणि मिसिसिपी शहरातून आलेल्या हार्मनला ‘अमेरिकन आयडॉल’चा मुकुट मिळाला.

24 वर्षीय ट्रेंड त्याच्या कुटुंबाच्या रेस्ट्राँमध्ये वेटर म्हणून काम करत असे. तो म्हणतो, ‘देवाच्या कृपेने मला आवाजाची देणगी मिळालेली आहे. परंतु मी कठोर मेहनत घेऊन आज इथपर्यंत पोहचलोय.’ शोचा अँकर रॅन सिक्रेस्टने त्याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा करताच ट्रेंडच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.

एकेकाळी संगीत आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये वादळ उठवलेल्या ‘अमेरिकन आयडॉल’ शोचा टीआरपी गेले काही सीझन कमी झाला होता. दर्शकांची रोडावणारी संख्या पाहता चॅनेलने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धकांचा उचित सन्मान करण्यासाठी शोच्या अंतिम भागात कोणत्याही मोठ्या सेलिब्रेटीला बोलावण्यात आले नाही.

Web Title: The Last 'American Idol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.