​सुट्यांची प्लॅनिंग सोडा; बॅग पॅक करा आणि एन्जॉय करा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2016 10:01 PM2016-04-14T22:01:05+5:302016-04-14T15:01:05+5:30

एन्जॉय करण्यासाठी करावयाच्या गोष्टींचे प्लॅनिंग, वेळापत्रक, टु-डू लिस्ट करून आपण त्यांची सगळीच मजाच घालवतो.

Leave the vacations plan; Pack the bag and enjoy !! | ​सुट्यांची प्लॅनिंग सोडा; बॅग पॅक करा आणि एन्जॉय करा!!

​सुट्यांची प्लॅनिंग सोडा; बॅग पॅक करा आणि एन्जॉय करा!!

Next
्हाळ्याची चाहुल लागताच सुट्यांमध्ये एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे बेत आखले जातात. मुलांच्या शाळेला जरी सुट्या असल्या तरी आॅफिसमधून सुटी मिळेल का नाही हा तर प्रश्नच राहतो.

आणि समजा मिळालीच तर विकेंडला लागून तीन-चार दिवस मस्त पैक फेरफटका मारण्यात येतो. कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी करायच्या म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग केली पाहिजे. पण संशोधक असे न करण्याचा सल्ला देतात.

विरंगुळा म्हणून किंवा एन्जॉय करण्यासाठी करावयाच्या गोष्टींचे प्लॅनिंग, वेळापत्रक, टु-डू लिस्ट करून आपण त्यांची सगळीच मजाच घालवतो, असे एका रिसर्चमध्ये दिसून आले.

आॅफिस आणि दैनंदिन कामांचे नियोजन करण्यासाठी वरदान ठरणारे गुगल कॅलेंडर, टु-डू लिस्ट अ‍ॅप विरंगुळ्याचे प्लॅनिंग करण्यासाठी काही उपयोगाचे नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी रिलॅक्स होण्यासाठी फावल्या वेळाचे केलेल्या नियोजनमुळे काय परिणाम होतो, याचा 13 प्रोजेक्ट्सद्वारे अभ्यास केला.

तेव्हा असे समोर आले की, एखाद्या निश्चित वेळी आराम, एन्जॉयमेंट करायचे ठरवले असता त्याची मजा कमी होते. प्लॅनिंग केल्यावर लेझ्यर अ‍ॅक्टिव्हिटी ‘काम’ वाटू लागतात. अमुक अमुक वेळी मी अशी मजा करेल, तमुक वेळी मी ते करेल असे म्हटल्यावर कसा एन्जॉय होणार?

तर मग प्लॅनिंग वगैरे सोडा आणि जा बिनधास्त सुटीवर.

Web Title: Leave the vacations plan; Pack the bag and enjoy !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.