लिंकन हाऊसचे नाव बदलणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:33+5:302016-02-07T08:11:53+5:30
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती सायर पूनावाला यांनी महिन्याआधी मुंबईतील लिंकन हाऊस विकत घेतले.
Next
प्रश्न : लिंकन हाऊस - तुम्ही हेच नाव कायम ठेवणार की बदलणार?
उत्तर - नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपैकी एक असलेल्या अब्राहम लिंकन यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. माझ्या दृष्टीने ही स्पेशल प्रॉपर्टी आहे. मी आनंदाने हेच नाव कायम ठेवणार आहे.
प्रश्न : ही प्रॉपर्टी का आावडली?
उत्तर - 'लिंकन हाऊस'सारखी प्रॉपर्टी अनेक अर्थाने दुर्मिळ आहे. समोरच असलेला समुद्र तुम्हाला प्रेमात पाडतो. ही ऐतिहासिक वास्तू आहे. मुंबईत अशा शांत ठिकाणी असलेली वास्तू कुणाला आवडणार नाही? योग्य मूल्यात आणि योग्य वेळेत आम्हाला हवी तशी वास्तू मिळाली, याचे समाधान आहे.
प्रश्न : या वास्तूच्या परिसरात अनेक तोफा आहेत. या इथेच राहणार आहेत का?
उत्तर- अर्थातच! येथील महत्त्वाच्या वस्तू आहे, तिथेच राहणार आहेत. मुळात १९५0 मध्ये हा राजवाडा होता. त्याला मूळ रूप देण्यासाठी बराच जीर्णोद्धार करावा लागेल. मुंबईत आम्हाला मनासारखे घर मिळाले आहे. गृहप्रवेशाची घाई नाही. मनासारखे काम झाल्यावर आम्ही तेथे राहण्यास जाऊ.