​२००० आणि ५००च्या नोटेवर ऐका मोदींचे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 05:28 PM2016-11-20T17:28:19+5:302016-11-20T17:28:19+5:30

आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची आकस्मिक घोषणा करून सर्व देशवासियांना जोरदार धक्का दिला होता.

Listen to the 2000s and 500s talk of Modi speech | ​२००० आणि ५००च्या नोटेवर ऐका मोदींचे भाषण

​२००० आणि ५००च्या नोटेवर ऐका मोदींचे भाषण

Next
नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची आकस्मिक घोषणा करून सर्व देशवासियांना जोरदार धक्का दिला होता. त्यावेळचे भाषण नव्याने आलेल्या २००० आणि ५००च्या नोटांवर ऐकता येणार आहे. या नोटा स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची सुविधा देणारे अ‍ॅप आता विकसित करण्यात आले आहे. या नवीन नोटा देशाच्या कानाकोपºयात पोहोचल्या असून, दोन्ही नोटांना स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ नोव्हेंबरचे नोटबंदीची घोषणा करणारे भाषण ऐकता येणार आहे. यासाठी ‘मोदी की-नोट’ हे खास अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. काही दिवसांमध्येच हे अ‍ॅप तुफान लोकप्रिय ठरले असून, सोशल मीडियातही याचीच चर्चा सुरू आहे.

Web Title: Listen to the 2000s and 500s talk of Modi speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.