फेसबुकवर आता लाइव्ह आॅडिओ फीचर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 06:39 PM2016-12-21T18:39:33+5:302016-12-21T18:39:33+5:30
सायबर विश्वातील आॅनलाईन रेडिओ आणि पॉडकास्टींगची मोठी लोकप्रियता पाहून या दोन्हींना सक्षम पर्याय म्हणून आता फे सबुक आपल्या युजर्ससाठी ‘लाईव्ह आॅडिओ’ म्हणजेच ध्वनी प्रक्षेपणाचे फीचर उपलब्ध करणार आहे.
Next
स यबर विश्वातील आॅनलाईन रेडिओ आणि पॉडकास्टींगची मोठी लोकप्रियता पाहून या दोन्हींना सक्षम पर्याय म्हणून आता फे सबुक आपल्या युजर्ससाठी ‘लाईव्ह आॅडिओ’ म्हणजेच ध्वनी प्रक्षेपणाचे फीचर उपलब्ध करणार आहे. फेसबुकने काही महिन्यांपुर्वीच व्हिडीओच्या स्वरूपात ‘लाईव्ह ब्रॉडकास्टींग’ची सुविधा प्रदान केली आहे. जगभरात हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. याच्या सोबत आता फेसबुकने लाईव्ह आॅडिओची सुविधा देण्याचीही घोषणा केली आहे. जगातील अनेक भागांमध्ये इंटरनेटचा वेग तुलनेत कमी असल्यामुळे व्हिडीओ प्रक्षेपणात अडचणी निर्माण होत असतात. या पार्श्वभूमिवर ‘लाईव्ह आॅडिओ’चे फिचर वापरकर्त्यांच्या मदतीला धावून येणार आहे. यासाठी फेसबुकने बीबीसी आणि हार्पर कॉलिन्स या संस्थांचे सहकार्य घेतले आहे. याशिवाय काही लेखकांशीही करार करण्यात आला आहे. यांच्या मदतीने लाईव्ह आॅडिओच्या सेवेला नवीन आयाम प्रदान करण्यात येणार असल्याचे फेसबुकतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.