​व्हॉट्स अ‍ॅपवर आता लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2016 06:05 PM2016-11-23T18:05:32+5:302016-11-23T18:05:32+5:30

‘लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग’ची सुविधा फेसबुकवर अत्यंत लोकप्रिय झाल्यानंतर त्यापाठोपाठ आता व्हॉट्स अ‍ॅपवर ही सुविधा लवकरच आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. सध्या याची चाचणीही सुरू आहे.

Live video streaming facility now on the Whatsapp app | ​व्हॉट्स अ‍ॅपवर आता लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा

​व्हॉट्स अ‍ॅपवर आता लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा

Next
ाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग’ची सुविधा फेसबुकवर अत्यंत लोकप्रिय झाल्यानंतर त्यापाठोपाठ आता व्हॉट्स अ‍ॅपवर ही सुविधा लवकरच आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. सध्या याची चाचणीही सुरू आहे. ट्विटरवरही पेरिस्कोपच्या माध्यमातून कुणीही लाईव्ह स्ट्रिमिंग करू शकतो. इन्स्टाग्रामने तर आताच हे फिचर ताज्या अपडेटमध्ये देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आता व्हाटस अ‍ॅपनेही लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगची चाचणी सुरू केली आहे. काही भारतीय यूजर्सच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून ही चाचणी घेण्यात येत आहे.
सद्यस्थितीत आपण व्हॉट्स अ‍ॅपवर एकमेकांना व्हिडीओ क्लिप्स वा त्या व्हिडीओच्या लिंक पाठवू शकतो. आता मात्र कोणत्याही घटनेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण शक्य होणार आहे. काही भारतीय यूजर्सला हे फिचर चाचणीसाठी मिळाले असून ‘अँड्रॉईडसोल’ या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार आता आपण वैयक्तिक इनबॉक्स अथवा एक वा एकापेक्षा जास्त ग्रुप्समध्ये व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रिमिंग करू शकतो.

Web Title: Live video streaming facility now on the Whatsapp app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.