नववर्षाच्या पार्टीत असे दिसा स्टायलिश !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2016 02:53 PM2016-12-31T14:53:41+5:302016-12-31T14:53:41+5:30
नवे वर्ष दणक्यात सुरू झाले असले तरी तरुणाईची झिंग अजून उतरलेली नाही. अजूनही बहुतांश ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना आपण सुंदर दिसायला हवे असे प्रत्येक तरुणींना वाटते.
Next
नवे वर्ष दणक्यात सुरू झाले असले तरी तरुणाईची झिंग अजून उतरलेली नाही. अजूनही बहुतांश ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना आपण सुंदर दिसायला हवे असे प्रत्येक तरुणींना वाटते. यासाठी अनेक पयार्यांचा अवलंबदेखील करण्यात येतो. खाली दिलेल्या टिप्सच्या आधारे आपण पार्टीमध्ये अधिकच सुंदर व स्टायलिश दिसू शकता.
कसा कराल मेकअप
* मेकअप करताना मेट लिपस्टिक आणि मेट लिप लायनर वापरा, कारण हे टिकाऊ असते.
* चेहऱ्यावर फौंडेशन लावण्यासाठी ओल्या स्पंजचा वापर केल्यास एक सारखे पसरते. त्यामुळे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
* पार्टीत अधिक सुंदर दिसण्यासाठी लाल रंगाचे लिपस्टिक व सोनरी रंगाचे आयशॅडो लावा.
* चेहऱ्यावर मेकअप करताना चुकून जास्त ब्लश लावले असल्यास ब्रशच्या साह्याने गाल व कानापाशी हलक्या हाताने घासून अतिरिक्त ब्लश काढून घ्या.
* पार्टीत आपण स्मोकी लूकमध्येही जाऊ शकता. यासाठी गडद चमकणारा वेलवेट रंगाचा आयशॅडो वापरता येईल शिवाय डार्क क्रीम आयलायनर लावल्यास सौंदर्यात अधिकच भर पडेल.
केसांच्या सौंदयार्साठी
* आपले केस छोटे किंवा लांब, सरळ किंवा कुरळे असतील तरीही पोनीटेल हेअरस्टाइल करा. कारण यामुळे आपण अधिकच आकर्षक दिसाल. पोनीटेल बनविण्यासाठी मागील केस वर करून कंगवा करा. यामुळे केस जास्त दाट दिसण्यास मदत होईल.
* केस मोकळे सोडण्याऐवजी दोन्ही बाजूंचे केस घेऊन वेणी घाला.
* पार्टी सीजनमध्ये केसांची निगा राखणे खूप गरजेचे आहे. हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर इ. केसांच्या आरोग्यसाठी अपायकारक ठरतात. केसांचे पोषण व मुळांच्या मजबूतीसाठी हेअर स्पा नक्की करा.
* तुमच्या जवळच्या लॅक्मे सलूनमध्ये केयर-अ-स्पा व ट्रेसप्लेक्स स्पा थेरपी उपलब्ध आहे. ही थेरपी तुमच्या केसांना पोषण देईल व यामुळे हेअर स्टाईल करायला कमी वेळ लागेल.