नोकरी शोधताय? तत्पूर्वी करा ही तयारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 11:42 AM2017-11-26T11:42:04+5:302017-11-26T17:12:04+5:30
नोकरी शोधणे हे सोपे काम नाही, पण त्याकरता बरेच मार्ग आणि संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला खूप कष्ट करण्याची गरज आहे. जर तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.
न करी शोधण्यासाठी कधी कधी खूप कालावधी लागतो ही एक खूप लांब प्रक्रिया आहे. तुम्हाला त्यामधे नकार मिळाल्यास एक प्रकारचा हताशपणा येतो आणि नैराश्य येते. आणि त्यामुळे तुम्हाला हे सर्व सोडण्याची इच्छा होते. नोकरी शोधणे हे सोपे काम नाही, पण त्याकरता बरेच मार्ग आणि संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला खूप कष्ट करण्याची गरज आहे. जर तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.
*बायोडाटा
सर्व प्रथम आपला परिपूर्ण बायोडाटा तयार केला पाहिजे. सध्याच्या युगामध्ये इंटरनेटचे महत्त्वाचे योगदान आहे. तुम्ही नोकरीसाठी इंटरनेट व्दारे अर्ज करु शकता. त्यासाठी तुमची पहिली पायरी म्हणजे ई-मेल मध्ये अकाऊंट उघडावे लागेल.
*कव्हर लेटर लिहणे
तुमचा बायोडाटा कुठेही पाठवण्याआधी त्याबरोबरच कव्हर लेटर (खुलाश्याचे पत्र) सुध्दा पाठवणे आवश्यक असते. कव्हर लेटर हे कमीत कमी पण परिपुर्ण असाव. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात हे व्यवस्थीत प्रकारे लिहा. तुम्हाला ही नोकरी का करायची आहे याचा खुलासा करा या पदासाठी तुम्ही कसे योग्य आहात हे देखील लिहा. तुम्ही या पदाकरता कसे योगदान करू शकणार आहात हे व्यवस्थितरीत्या मांडा. जर तुमच्या जवळ ज्ञान असेल पण अनुभव नसेल तर तुम्ही कशा प्रकारे कामास न्याय देऊ शकाल हा खुलासा करा.
*इंटरव्ह्यूची तयारी
cnxoldfiles/नाही असे देऊ नका शक्य असेल तर स्पष्ट करुन, पूर्ण वाक्यात सांगा. जर तुम्हाला कोणता प्रश्न समजत नसेल आणि तुम्हाला त्यावर विचार करायला वेळ हवा असेल तर तसे स्पष्टपणे सांगा. तुम्ही आधी ज्या कंपनी मध्ये काम करत होता त्या कंपनी बद्दल वाईट बोलू नका आणि तुम्ही ती कंपनी का सोडली याबद्दल थोडे स्पष्टीकरण द्या. तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळी वेतन, रजा, बोनस आणि सेवानिवृत्ती याबद्दल चर्चा करु नका, आणि तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारतात वेतन किती पाहीजे तेंव्हा त्या पदाकरता जे वेतन योग्य आहे ते मागा.