स्टायलिश लूकन राखी पौर्णिमा करता येइल स्पेशल. कपड्यांपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीला द्या स्पेशल टच.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 06:35 PM2017-08-05T18:35:00+5:302017-08-05T18:41:32+5:30
सणवार म्हणजे सजण्या धजण्याची उत्तम संधी. त्याला राखी पौर्णिमा हा सण अपवाद कसा असेल? राखी पौर्णिमेला हलकी फुलकी फॅशन करून स्टायलिश दिसता येतं. त्यासाठी या टिप्स.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
सणवार म्हणजे खरंतर आनंद साजरा करण्याचे सोहळेच. त्यामुळे राखीपौर्णिमेला सजण्याधजण्याची एक उत्तम संधी म्हणून अनेक मुली त्याकडे बघतात. फॅशन आणि परंपरा यांचा उत्तम मेळ साधून तुम्ही राखीपौर्णिमेलाही स्पेशल दिसू शकता. त्यासाठी या काही टिप्स खास तुमच्यासाठी .
राखी पौर्णिमेला स्पेशल दिसण्यासाठी
* चमकदार रंग असलेला पोशाख निवडा. रॉयल ब्ल्यू, पॅरट ग्रीन, डार्क मरून, लाल, फ्युशिआ पिंक अशा रंगांचे कपडे या दिवशी परिधान करा.
* वर्क असलेला कुर्ता, चुडीदार आणि बांधणीचा दुपट्टा देखील अशा सणांना छान दिसतो. त्यावर झुमके, बांगड्या आणि त्याला साजेसा हलकासा मेकअप करा.
* इंडोवेस्टर्न लुक हवा असेल तर एथनिक प्रिण्टेड सिल्क स्कर्ट आणि त्यावर एखादा चकाकता टॉप घाला. दुपट्टा हवा असेल तर घ्यायला हरकत नाही.
* जर तुम्ही साडीच नेसत असाल तर राखीपौर्णिमेच्या दिवशी जॉर्जेट, शिफॉन यांपैकी कोणत्याही कापडाच्या साडीला प्राधान्य द्या. जाड बॉर्डर, रिच पल्लू आणि हेव्ही वर्क असलेले ब्लाऊज असे कॉम्बिनेशन या साडीबरोबर छान दिसेल.
* तुम्ही मिक्स मॅचही करू शकता. म्हणजे लग्नातल्या साडीवरचे भरगच्च वर्क असलेले ब्लाऊज आणि त्यावर रंगसंगतीशी सुसंगत अशी जाड बॉर्डर असलेली, झुळझुळीत साडीही शोभून दिसेल.
मेकअप कसा कराल?
* फार गडद मेकअप करू नका.
* थोडासा हलकासा, तुमच्या पोशाखाला साजेसा मेकअप कॅरी करा.
* न्यूड कलरची लिपिस्टक, मिरर नेलपॉलिश, किंवा ग्रे, पिंक असे डिसेंट नेलपॉलिश लावा.
* नखं किंवा ओठ खरखरीत झालेले असल्यास त्यावर थोडासा लिपबाम किंवा व्हॅसेलीन लावा.
हेअर स्टाईल
चांगलं दिसायचं असेल तर केसांचीही नीट स्टाईल केलेली हवी. त्यासाठी थोडा वेळ देऊन केस नीट सेट करा. सकाळी आंघोळीच्या वेळी शाम्पू लावा. त्यानंतर कंडीशनर लावून केस नीट कोरडे करा. तुमचे केस मुळातच चांगले नसले तर तुम्ही सप्लिमेंटचा वापर करू शकता आणि एखादी छानशी स्टाईल करू शकता.
राखीचे ताट
तुम्ही स्वत: जितक्या सुंदर दिसाल तितकेच सुंदर तुम्ही राखीचे ताटही सजवा. यामुळेही या प्रसंगाला वेगळीच उंची मिळते. या अशा ताट सजवण्याच्या क्रियेतूनही भावाप्रतीचं मनातलं प्रेम, त्याच्याबद्दलच्या स्पेशल भावना व्यक्त होत असतात. यासाठी नेटवरच्या विविध आयडिया तुमच्या उपयोगी पडू शकतात.