1.23 अरब रूपयांची जगातील सर्वात महागडी सॅन्डल तुम्ही पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:36 AM2018-09-26T11:36:39+5:302018-09-26T11:38:21+5:30
अनेकदा आपण फॅशन वर्ल्डमधील ड्रेसेस, ज्वेलरी यांच्या किंमती ऐकून थक्क होतो. जगभरातील महागडे ब्रँड आणि त्या ब्रँडच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. अशातच आणखी एका वस्तूची किंमत ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
अनेकदा आपण फॅशन वर्ल्डमधील ड्रेसेस, ज्वेलरी यांच्या किंमती ऐकून थक्क होतो. जगभरातील महागडे ब्रँड आणि त्या ब्रँडच्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. अशातच आणखी एका वस्तूची किंमत ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बोलत आहोत जगातल्या सर्वात महागड्या सॅन्डलबाबत. आता तुम्ही विचारात पडला असाल ना? अनेक प्रश्नही पडले असतीलच. जाणून घेऊयात नक्की काय आहे असं या सॅन्डलमध्ये...
जगातील सर्वात महाग सॅन्डल लवकरच लॉन्च करण्यात येणार आहेत. याची किंमत जवळपास 1.7 कोटी डॉलर म्हणजेच 1.23 अरब रूपये असणार आहे. बुधवारी ही सॅन्डल संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही जगातील सर्वात महागडी सॅन्डल हिरे आणि शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. सॅन्डल डिझाइन करण्यासाठी 9 महिन्यांचा वेळ लागला आहे.
View this post on Instagram
शेकडो हिरे जडवले गेले या सॅन्डलवर
या सॅन्डलला 'पॅशन डायमंड शू' असं नाव देण्यात आलं आहे. या सॅन्डलवर शेकडो हिरे जडवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त यामध्ये 15-15 कॅरेटचे 2 इम्पोजिंग डी-फ्लॉलेस डायमंडसुद्धा लावण्यात आले आहेत. सॅन्डलची ही जोडी यूएईतील ब्रँड 'जदा दुबई'ने 'पॅशन ज्वेलर्स'सोबत तयार केली आहे. जदा हा ब्रँड दुबईमध्ये हिरे जडवलेल्या सॅन्डल्स तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बुधवारी जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल बुर्ज अल अरबमध्ये ही सॅन्डल लॉन्च करण्यात येणार आहे.
विक्रीसाठी फक्त एकच जोड सॅन्डल उपलब्ध
रिपोर्ट्सनुसार, ही सॅन्डल सध्या जगातील सर्वात महागडी सॅन्डल आहे. याआधी डेबी विन्घम हाई हील्स ही जगातील सर्वात महागडी सॅन्डल होती. तिची किंमत 1.9 अरब रूपये होती. लॉन्च इवेंटमध्ये या सॅन्डलचा प्रोटोटाइप 36EU ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जो कोणी कस्टमर ही सॅन्डल खरेदी करेल त्याच्या पायाच्या मापानुसार ही सॅन्डल कस्टमाइज करून त्याला देण्यात येणार आहे. या सॅन्डलबाबतची खास गोष्ट म्हणजे, या पॅशन डायमंड सॅन्डलची फक्त एकच पेअर विक्रीसाठी असणार आहे. ती फक्त कस्टमरसाठी असेल जो ती सॅन्डल खरेदी करेल.