निकामी सीडीने बनवा दिवाळीत क्रिएटिव्ह वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2016 06:32 PM2016-10-27T18:32:24+5:302016-10-27T18:32:24+5:30
आपल्या घरात कित्येक अशा वस्तू असतात, ज्यांना आपण निकामी समजून फेकून देतो. आपणास माहिती आहे का, या निकामी वस्तूंनी आपण कित्येक चांगल्या उपयुक्त वस्तू बनवू शकतो. आज आपण जुन्या व निकामी सीडींपासून बनविण्यात येणाºया काही क्रिएटिव्ह वस्तूंच्या बाबतीत माहिती घेऊया...
Next
१. वॉल क्लॉक
आपण जुन्या सीडींपासून वॉल क्लॉक बनवू शकता. यासाठी आपल्याला सीडी, की-बोर्डच्या कीज, घड्याळाचे काटे, ग्लू आणि मोटर हवी. सर्वप्रथम जुन्या सीडीवर की-बोर्डच्या कीज लावा आणि मोटर तसेच घड्याळाच्या काट्यांना फिट करा.
२. मिरर डेकोरेशन
जुन्या सीडींनी आपण आपल्या आरशाचे छान डेकोरेशन करु शकता. आरशाच्या चारही बाजूंनी सीडींना ग्लूच्या साह्याने चिटकवा. याने आपल्या आरशाला वेगळाच लूक मिळेल.
३. सीडी कोस्टर
सर्वप्रथम सीडीवर कलरफुल पेपर चिकटवा. त्यावर स्केच पेन किंवा क्रेआॅन्सने डिझाइन करुन आपण सीडी कोस्टर तयार करु शकता.
४. सीडी इयररिंग स्टॅँड
सीडी इयररिंग स्टॅँड बनविण्यासाठी सीडीच्या चारही बाजूने ड्रिल मशीनने छिद्र पाडा. त्या सीडीला सॅँडमध्ये लावा. आता आपण सीडीच्या छिद्रांमध्ये इयररिंग्स लटकवू शकता.
५. सीडी डिस्को बॉल
सीडी डिस्को बॉल बनविण्यासाठी थर्माकॉलच्या बॉलवर ग्लू लावून सीडीला कापून चिटकवा. याने थर्माकॉल बॉलला आकर्षक लूक येईल. हा बॉल आपण कुठेही सजवू शकता.