आनंदी आयुष्यासाठी करा दिवसाला दोन फेसबुक कमेंटस्
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2016 02:45 PM2016-09-06T14:45:22+5:302016-09-06T20:15:22+5:30
फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ कमेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते.
च ंगल्या आरोग्यासाठी दिवसाला एक सफरचंद खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. परंतु आनंदी व चिंतामुक्त आयुष्यासाठी आता फेसबुकवर दिवसाला दोन कमेंट करण्याचा सल्ला देण्याची वेळ आली आहे. फेसबुकवर आपल्या जवळच्या मित्रांच्या पोस्टवर दिवसातून दोन प्रांजळ क मेंटस् केल्यामुळे लग्न करणे किंवा बाळाला जन्म देण्याएवढे समाधान मिळते, असे एका अध्ययनात दिसून आले.
जेव्हा जवळचे मित्र फेसबुकवर वैयक्तिक आणि मनापासून कमेंट करतात तेव्हा दोघांना समाधान मिळते. केवळ लाईक किंवा एका शब्दांत दिलेल्या कमेंटमुळे काही फरक पडत नाही. मात्र, सुहृद भावनेने दिलेल्या कमेंटमुळे समोरिल व्यक्तीला व आपल्या स्वत:लादेखील एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.
कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘ह्युमन-कं प्युटर इंटरअॅक्शन इन्स्टिट्यूट’चे प्राध्यापक रॉबर्ट क्रॉट यांनी सांगितले की, फेसबुकवर जेव्हा जवळच्या मित्रांशी आपण मनापासून बोलतो तेव्हा आपल्याला खूप बरे वाटते. म्हणजे केवळ करायचे म्हणून केलेले आॅनलाईन संभाषण नाही तर खरोखरं हार्ट-टू-हार्ट संवाद साधतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
फेसबुक अॅड्समार्फत निवडण्यात आलेल्या ९१ देशांतील १९१० यूजर्सच्या अध्ययनाअंती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये मूड आणि वर्तणूक लक्षात घेतली असता फेसबुकवर जवळच्या लोकांशी कनेक्टेड राहिल्यामुळे त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक व चिंतामुक्त बनला.