​मारिया कीयूरी ‘डिआॅर’ची नवी क्रिएटिव्ह डिरेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2016 03:30 PM2016-07-08T15:30:48+5:302016-07-08T21:00:48+5:30

फॅशन ब्रँड ‘डिआॅर’ने इटालियन डिझायनर मारिया ग्रात्झी कीयूरी यांची क्रिएटिव्ह डिरेक्टरपदी निवड केली आहे.

Marie Curie 'creator's new creative director | ​मारिया कीयूरी ‘डिआॅर’ची नवी क्रिएटिव्ह डिरेक्टर

​मारिया कीयूरी ‘डिआॅर’ची नवी क्रिएटिव्ह डिरेक्टर

Next
प्रसिद्ध फ्रेंच फॅशन ब्रँड ‘डिआॅर’ने इटालियन डिझायनर मारिया ग्रात्झी कीयूरी यांच्या नावाची घोषणा करत प्रथमच एका महिलेची आपल्या कंपनीच्या क्रिएटिव्ह डिरेक्टरपदी निवड केली आहे. ५२ वर्षीय मारिया आतापर्यंत ‘वॅलिन्टिनो’ ब्रँडच्या क्रिएटिव्ह मुख्य होत्या.

गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये बेल्जिअन रॅफ सिमॉन्सने राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. त्याच्या जाण्याने कंपनीने स्वत:च्या कार्यपद्धतीची सखोल मीमांसा करून आपल्या धोरणांमध्ये लक्षणीय बदल केले. मारिया यांची निवड या धोरणांचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.

कीयूरीच्या जाण्याने ‘वॅलिन्टिनो’ची जबाबदारी आता एकट्या पिएरपाओलो पीशिओली यांच्यावर राहणार आहे. कीयूरी आणि पीशिओली या जोडीने मिळून ‘वॅलेन्टिनो’ ब्रँडचा युरोपमध्ये विस्तार करत त्याला सर्वाधिक नफ ा कमावाणाºया ब्रँडस्पैकी एक बनवले. केवळ सात वर्षांत त्यांनी कंपनीचा कारभार चौपटीने वाढवून २०१५ मध्ये ४८ टक्क्यांची वृद्धी केली.

कीयूरीच्या अशा कामगिरीमुळेच ‘डिआॅर’ने त्यांची निवड केली आहे. नुकतेच पॅरीसमध्ये त्यांनी वॅलिन्टिनोसाठी सादर केलेल्या कलेक्शबद्दल ‘व्होग’ फॅशन मॅगझाीनने ‘अविस्मरणीय निरोप’ असे संबोधले. ‘डिआॅर’ची क्रि एटिव्ह डिरेक्टर म्हणून कीयूरी ३० सप्टेंबर रोजी पॅरीसमध्ये आपले पहिले कलेक्शन सादर करणार आहे.

Web Title: Marie Curie 'creator's new creative director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.