मीटिंग मॅनर्स हवाच !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 04:27 PM2017-01-10T16:27:00+5:302017-01-10T16:28:32+5:30

कोणत्याही कार्यालयीन किंवा बिझनेस मीटिंगचे काही नियम असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मीटिंग मॅनर्स पाळायलाच हवेत. कारण आपण मीटिंगमध्ये स्वत:ला कसे प्रेझेंट करता यावरुन आपल्याविषयी धारणा तयार होते.

Meeting managers! | मीटिंग मॅनर्स हवाच !

मीटिंग मॅनर्स हवाच !

Next
ong>-रवीन्द्र मोरे 

कोणत्याही कार्यालयीन किंवा बिझनेस मीटिंगचे काही नियम असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मीटिंग मॅनर्स पाळायलाच हवेत. कारण आपण मीटिंगमध्ये स्वत:ला कसे प्रेझेंट करता यावरुन आपल्याविषयी धारणा तयार होते. बऱ्याचदा मीटिंगदरम्यान आपल्याकडून कळत-नकळत चुका होत असतात. त्यामुळे मीटिंगदरम्यान सहकारी आणि बॉस यांच्यावर आपले बॅड इंप्रेशन पडते. नेमके मीटिंगदरम्यान कसे वागावे म्हणजेच मीटिंग मॅनर्स कसे असावेत याबाबत जाणून घेऊयात. 

* मीटिंगला वेळेवर पोहोचा
कधीही मीटिंगला वेळेवर पोहोचा. कारण व्यक्तिमत्वाची ओळख वेळ पाळण्यावर होत असते. मीटिंगची वेळ न पाळल्यास बॅड मॅनर्स गणले जाते. त्यामुळे कोणत्याही मीटिंगसाठी वेळेत जा. यामुळे तुमचा प्रामाणिकपणा लक्षात येईल.

* स्वत:चा परिचय व्यवस्थित द्या
मीटिंगचा पहिला शिष्टाचार म्हणजे स्वत:चा परिचय व्यवस्थित देणे होय. बऱ्याचदा मीटिंगमधे एकमेकांचा परिचय नसतो, त्यामुळे आधी परिचय करायला हवा.  

* मीटिंगचा अजेंडा ठरवा
मीटिंगला जाण्यापूर्वी ती कशाशी संबंधित आहे हे जाणून घ्या. संपूर्ण अभ्यास करून तयारी करा. पूर्वतयारी न करता मीटिंगमध्ये सहभागी होणे योग्य नाही. 

* नीट बसा 
बऱ्याचदा मीटिंग रूममध्येदेखील काही लोक आळश्यासारखे बसतात. त्यामुळे आपल्याकडे सहकाºयांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोे. असे बसणे योग्य दिसत नाही. यामुळे मीटिंगमध्ये असताना नीट बसा व नीट वागा. 

* फोन पाकिटात ठेवा 
मीटिंग दरम्यान बरेचजण फोन टेबलवर ठेवतात. मीटिंगदरम्यान फोन वाजल्यास ते शांतताभंग करणारे ठरते. त्यामुळे फोन शक्यतो पाकिटात ठेवा. शिवाय फोन सायलेंट मोडवर ठेवा आणि फोन उचलणे खूपच आवश्यक असेल तर मीटिंग रूममधून बाहेर येऊन फोन उचला. 

* योग्य वेळी प्रश्न विचारा
आवश्यक असेल तेव्हा योग्य वेळी प्रश्न विचारा. निरर्थक प्रश्न विचारू नका. तसेच मीटिंग संपायच्या वेळी प्रश्न विचारू नका.

Web Title: Meeting managers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.