​नेदरलँडमधील पुरुष तर लॅत्व्हिएन महिला आहेत जगात सर्वात उंच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2016 03:29 PM2016-07-26T15:29:24+5:302016-07-26T20:59:24+5:30

नेदरलँड देशातील पुरुषांची सरासरी उंची १८३ सेंमी (६ फुट) तर लॅत्व्हिएन महिलांची सरासरी उंची १७० सेंमी (पाच फुट ७ इंच) एवढी असते.

Men in the Netherlands and Latvia are the world's tallest people | ​नेदरलँडमधील पुरुष तर लॅत्व्हिएन महिला आहेत जगात सर्वात उंच

​नेदरलँडमधील पुरुष तर लॅत्व्हिएन महिला आहेत जगात सर्वात उंच

Next
ातील सर्वांत उंच माणसं कुठे राहतात असे जर तुम्ही विचारले तर त्याचे उत्तर नेदरलँडमधील पुरुष तर लॅत्व्हिया देशातील महिला देणे गरजेचे आहे. कारण नुकतेच एका अध्ययानातून हे सिद्ध झाले आहे. नेदरलँड देशातील पुरुषांची सरासरी उंची १८३ सेंमी (६ फुट) तर लॅत्व्हिएन महिलांची सरासरी उंची १७० सेंमी (पाच फुट ७ इंच) एवढी असते.

‘ई-लाईफ’ जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनामध्ये गेल्या शंभरवर्षांत १८७ देशांतील लोकांच्या उंचीमध्ये कसा व किती बदल झाला यावर अध्ययन करण्यात आले. त्यानुसार इराण आणि द. कोरियातील लोकांच्या उंचीमध्ये सर्वाधिक १६ - १८ सेंमीची सरासरी वृद्धी दिसून आली. विशेष म्हणजे अमेरिकेत हीच वाढ केवळ ६ सेंमी इतकीच आहे. १९१४ साली सर्वात उंच पुरुष व महिलांच्या क्रमवारी अमेरिकेचा अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक होता. मात्र आता ३७ आणि ४२व्या क्रमांकापर्यंत अमेरिकेची घसरण झाली आहे.

Height chart

अध्ययनातून हे तर स्पष्ट झाले आहे की, उंचीच्या बाबतीत युरोपिअन देशांचा दबदबा आहे. परंतु १९१४ मधील आकडेवारीशी तुलना केली असता पाश्चिमात्य देशांमधील लोकांच्या सरासरी उंचीमधील वाढ ही समतल झाली आहे. जगातील सर्वात कमी उंचीचे पुरुष (सरासरी १६० सेंमी) पुर्व टिमॉर या देशात तर सर्वात कमी उंचीच्या महिला ग्वाटमाला देशात राहतात. शंभर वर्षांपूर्वीदेखील ग्वाटमालाचा क्र मांक खालून पहिलाच होता.

संशोधनाचे सहलेखक आणि ‘इम्पेरिअ कॉलेज लंडन’चे जेम्स बेंथम यांनी माहिती दिली की, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश यासारख्या द. आशियाई व सब-सहारन आफ्रि का देशांतील लोकांच्या उंचीमध्ये मागच्या शंभर वर्षांत विशेष अशी वाढ (सरासरी १ ते ६ सेंमी)  झालेली नाही. तसे पाहिले गेले तर सब-सहारन आफ्रिक न भागातील लोकांची सरासरी उंची सत्तरच्या दशकांनंतर घटली आहे.

Tall

जगभरातील लोकांच्या उंचीमध्ये दिसून येणाऱ्या फरकामागे अनुवांशिकतेचे कारण असू शकते; मात्र आपले डीएनए अनेक कारणांपैकी एक आहेत असे संशोधकांचे मत आहे. प्रमुख संशोधक माजिद इझ्झाटी यांनी सांगितले की, आपली जनुके एवढ्या प्रचंड वेगाने बदलत नाही. तसेच संपूर्ण जगात त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक असतो असेदेखील नाही. म्हणून केवळ जीन्समुळे उंचीमध्ये फरक आढळतो असे म्हणता येणार नाही. अनेक कारणांपैकी ते एक आहे.

Web Title: Men in the Netherlands and Latvia are the world's tallest people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.